भोपाळ: मध्य प्रदेशातील दमोह येथील 93 वर्षीय महिला 40 वर्षानंतर विदर्भात आपल्या घरी परतल्या आहेत. पंचुबाई असे या वृद्ध महिलेने नाव आहे. लॉकडाऊनदरम्यान गुगलने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.
पंचुबाई 40 वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबीयांपासून विभक्त झाल्यानंतर दमोह येथील कोटा तला याठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यावेळी मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या पंचूबाईंना नूर खान आपल्या गावी घेऊन गेले होते.
लॉकडाऊनच्या काळात 3 मे रोजी दुपारी पंचुबाई यांच्याजवळ असलेल्या इसरार यांनी तुम्ही कोठून आला आहात, असा त्यांना सवाल केला. त्यावेळी पंचुबाई यांनी खंजामा नगर, पथरोट असे सांगितले. त्यानंतर इसरार यांनी गुगलवर सर्च केले असता खंजामा नगर असे ठिकाण सापडले नाही. मात्र, पथरोट असल्याचे दिसून आले.
तसेच, इसरार यांनी गुगलवर पथरोट गावातील एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर व्हॉट्सद्वारे त्या मोबाईलवर पंचुबाईंचे फोटो त्यांनी पाठविले. यामुळे अवघ्या दीड तासात 40 वर्षांपासून विभक्त झालेले कुटुंब पंचुबाईंना सापडले. त्यांचा नातू त्यांना आपल्या घरी नेण्यासाठी नागपूरहून आला होता.
इसरार यांचे वडील नूर यांचे 2007 मध्ये निधन झाले, परंतु संपूर्ण कुटुंब पंचूबाई यांची सेवा करत होते. इसरार म्हणाले, "दु:ख वाटत आहे. सर्व गावकरी पंचुबाईंना त्यांच्या घरी पाठविण्यास नकार देत होते. पण, आता त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्या आजीची सेवा करायची आहे. त्या आपल्या कुटुंबीयांना भेटल्या हे चांगले आहे."
नागपूरहून दमोहला आलेले पंचूबाई यांचे नातू पृथ्वी कुमार शिंगले यांना ग्रामस्थांचे प्रेम पाहून आश्चर्य वाटले. ते म्हणाले, "मी कोटालाबच्या ग्रामस्थांचे आभार मानू इच्छितो. 40 वर्षांपासून आमच्या आजीची आपण सेवा केली आहे. पण, मी येथून आजीला घेऊन जात आहे. याबद्दल मला खंत वाटते. मात्र, तिची काळजी घेण्याची संधी आता मला मिळत आहे, याचा आनंद आहे."
आणखी बातम्या...
नवी मुंबईत 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीमधून पाहिले सूर्यग्रहण
दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या!