...तर पुरुषाचं डोकेही फोडेन, बरं झालं दारूच्या बाटल्याच होत्या - उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:52 PM2022-03-14T19:52:12+5:302022-03-14T19:53:06+5:30
'मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर आक्षेप घेत नाही. ते अत्यंत सात्विक व्यक्ती आहेत...
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रविवारी अचानक भोपाळमधील एका दारूच्या दुकानात पोहोचल्या आणि त्यांनी दगड फेकत बाटल्या फोडल्या. राज्यात दारूबंदीची मागणी करत उमा भारती आज आक्रम झाल्याचे दिसून आले.
यासंदर्भात बोलताना उमा भारती म्हणाल्या, 'मला राजधानी भोपाळच्या भेल भागातील बरखेडा पठाणी येथील काही महिलांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आणि मद्यधुंद लोक त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वागतात हेही सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून मला रहावले गेले नाही आणि मी दगड उचलून दारूच्या बाटल्यांवर संपूर्ण ताकदीनिशी फेकला.
राज्यातील दारू विक्रीवर सातत्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या उमा भारती आज तकसबोत बोलताना पुढे म्हणाल्या, 'मी तर अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देते. मग कुठे गाईंवर अत्याचार होवो अथवा महिलांवर. एवढं बरं झालं, की त्या दारूच्या बाटल्या होत्या. पण महिलांचा अपमान कुणी पुरुष करेल तर, मी त्याचंही डोकं फोडीन.'
भारती म्हणाल्या, दारूचे दुकान जेथे आहे, तेथे जवळच मंदीर आहे, गरीब मजुरांची वस्ती आहे. यामुळे प्रशासनाने या दुकानाचे केवळ लायसंन्सच कँसल करू नये, तर त्यावरून बुलडोजरही फिरवावा. एवढेच नाही, तर 'मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर आक्षेप घेत नाही. ते अत्यंत सात्विक व्यक्ती आहेत आणि मी दावा करते, की दारूचे दुकान भर वस्तीत आहे, हे त्यांना माहितही नसेल,' असेही भारती म्हणाल्या.