Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:41 AM2018-12-11T10:41:27+5:302018-12-11T12:51:54+5:30
भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.
भोपाळ - भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 109 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 109 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 12 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. यासाठी 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यभरात सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. राज्यात 2 हजार 899 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यांच्या भविष्याचा फैसला आज होईल. विजयाची हॅट्रिक केलेल्या भाजपासमोर सध्या काँग्रेसचं तगडं आव्हान आहे. अनेक एक्झिट पोल्सनी काँग्रेस आणि भाजपामध्ये जबरदस्त टक्कर असेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे 'हिंदुस्तान का दिल' कोणाला कौल देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
Kamal Nath, Congress: These are trends, but I am fully confident that we will get full majority #MadhyaPradeshElectionspic.twitter.com/IFoQVSf9E6
— ANI (@ANI) December 11, 2018