शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:13 PM

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण काही जागांवर किरकोळ फरकानं भाजपाला पराभव पत्करावा लागला.

भोपाळ - मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण काही जागांवर किरकोळ फरकानं भाजपाला पराभव पत्करावा लागला. जर भाजपाकडून बूथ व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केले गेले असते तर आजचे चित्र कदाचित काहीसे वेगळे असते. काही जागांवर तर नोटामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट झाल्याचे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र या विजयामधील अंतरापेक्षा जास्त मतं नोटाला मिळाली आहेत. 

मध्य प्रदेशात बसपाला 2, एसपीला 1 आणि अपक्षांचा 4 जागांवर विजय झाला. मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी 116चा आकडा गाठणं आवश्यक आहे. सपा आणि बसपानं काँग्रेसला पाठिंबा दर्शवण्याची घोषणा केली आहे. जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला आणखी दोन जागांची गरज आहे. दरम्यान, या निकालाचं चित्र बदलण्यासाठी 'नोटा'नंही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मध्य प्रदेशात कमीत कमी 11 जागांवर नोटामुळे भाजपाचा खेळ पुरत बिघडला आहे.  

जाणून घेऊया 11 जागांची स्थिती

1. दमोहकाँग्रेसच्या राहुल सिंह यांचा 78,199 मतांनी विजय झाला. तर भाजपाचे जयंत मलैया येथे दुसऱ्या स्थानावर होते. या विजयामधील अंतर केवळ 798 मतांचं होते आणि येथे 1,299 मतं नोटाला मिळाली.

2. गुन्नौरकाँग्रेसचे शिवदयाल बागारी 57,658 मतांसहीत येथे आमदार म्हणून निवडून आले आहेत.  तर 55,674 मतांसहीत भाजपाचे राजेश वर्मा दुसऱ्या क्रमांक होते. येथेही लोकांनी नोटावर विश्वास दाखवला. येथे नोटाला 1,984 मतं मिळाली. 

3. राजपूरकाँग्रेस उमेदवार - बाला बच्चन  - 85,513 मतं.

बाला बच्चन यांनी भाजपाचे उमदेवार अंतरसिंह देवीसिंह पटेल यांना 932 मतांच्या फरकानं हरवलं. नोटाला 2485 मतं मिळाली.

4.  राजनगरराजनगरमध्येही नोटाचा करिश्मा दिसून आला. येथे काँग्रेसचे विक्रम सिंह आमदार म्हणून निवडून आलेत. सिंह यांना 40,362 मतं मिळालीयेत, तर भाजपाच्या एरविंद पटेरिया यांना  39,630 मतं मिळाली. तर 2,485 जणांनी नोटाचा स्वीकार केला. 

5. नेपानगरकाँग्रेसच्या उमेदवार सुमित्रा देवी कासडेकर यांचा 85,320 मतांनी विजय झाला, तर भाजपाच्या मंजू राजेंद्र दादू यांना 84,056 एवढी मतं मिळाली. सुमित्रा आणि मंजूमध्ये 1,264 मतांचं अंतर आहे तर नोटाला 2,551 जणांनी मतं दिली आहेत. 

6. सुवासरामध्य प्रदेशातील सुवासरा जागेवर काँग्रेसचे डांग हरदीप सिंह यांना 93,169 मतं मिळाली. त्यांनी भाजपाचे राधेश्याम नंदलाल पाटीदार यांचा 350 मतांनी पराभव केला. नोटा - 2,976 मतं

7. मांधाताकाँग्रेसचे नारायण पटेल 71,228 मतं मिळाली. त्यांनी भाजपाच्या नरेंद्र सिंह तोमर यांचा 1,236 मतांच्या फरकानं पराभव केला. 

नोटा - 1,575 मतं

8. जोबटकाँग्रेसच्या कलावती भूरिया - 46,067 मतंभाजपाच्या माधोसिंह डाबर - 44,022 मतं दोघांच्या मतांमध्ये 2,056 आकड्याचा फरकनोटा - 5139 मतं

9.  ब्यावराकाँग्रेसचे गोवर्धन सिंह यांनी भाजपाच्या नारायण सिंह पवार यांना 826 मतांनी हरवले. तर 1481 जणांनी नोटाचा पर्याय स्वीकार केला.  

10. ग्वालियर(एस)काँग्रेसचे प्रवीण पाठक यांनी भाजपाच्या नारायण सिंह कुशवाहा यांना 121 मतांनी हरवलं.1550 लोकांना नोटाला आपलं मत दिले. 

11.  जबलपूर(एन)काँग्रेसच्या विनय सक्केना यांनी भाजपाच्या शरद जैन यांना 578 मतांनी हरवलं. तर 1209 मतदारांना नोटाचा पर्याय निवडला. 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेस