भोपाल - भाजप कार्यसमितीच्या बैठकीत दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्राला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्चुअली संबोधित केले. ते म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (Madhya Pradesh BJP working committee meeting jp nadda attack on congress leader kamal nath)
तत्कालीन कमलनाथ सरकारवर निशाणा साधताना नड्डा म्हणाले, किमिशनचे रुपांतर कमीशनमध्ये झाले होते. प्रत्येक वर्गाला फसवणूकीशिवाय काही मिळाले नाही. शिंदे योग्य विचारसरणीचे होते, म्हणून ते आमच्यासोबत आले. कोरोना काळाचा उल्लेख करताना जेपी नड्डा म्हणाले, गेल्या दिड वर्षात सर्वच पक्ष ICU मध्ये गेले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ते. जीव धोक्यात घालून मैदानात उतरले आहेत. यावेळी जेपी नड्डा यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेसाठी एमपी सरकार आणि संघटनेचे कौतुक केले.
सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री शिवराज यांचा राहुल गांधींवर निशाणा -उद्घाटन सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींवर हल्ला चढवताना ते म्हणाले, तुमच्या काळात लस तयार करायला 4- 4, 5 - 5 वर्ष लागत होते. पंतप्रधान मोदींनी एप्रिल महिन्यात टास्क फोर्स तयार केला आणि देशाला को-व्हॅक्सीन मिळाली. मध्य प्रदेशने लसीकरणाचा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. कशा दिल्या, कुठून दिल्या? जयराम रमेश, पी चिदम्बरम, दिग्विजय, कमल नाथ सर्वच एकत्र झाले आणि जनतेचा विश्वासघात केला. मात्र, आम्ही 11 लाखहून अधिक डोस देऊन विक्रम बनवला.
आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल - ज्योतिरादित्य शिंदे -देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसने नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे.