1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:00 AM2021-09-28T11:00:32+5:302021-09-28T11:10:01+5:30

Madhya Pradesh: गावकऱ्यांनी अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप केला होता, त्यावर महिला आमदार रामबाई यांनी हे अजब वक्तव्यं केलं आहे.

Madhya Pradesh BSP MLA Rambai says small amount of bribe is okay to take | 1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य

1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य

googlenewsNext

भोपाळ:लाच घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लाचेच्या देवाण-घेवाणबद्दल सरकारकडून जनजागृती केली जाते. पण, तर एखाद्या नेत्यानेच लाच घेण्यास प्रोत्साहन दिले तर? अशीच घटना मध्य प्रदेशात घडली आहे. येथील पथरिया मतदारसंघाच्या बसपाच्या महिला आमदार रामबाई यांनी लाच घेण्यात काही चुकीचं नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी पथरियाच्या मतदारसंघातील सतऊआ गावातील काही लोक आमदार रामबाई यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन आले होते. नागरिकांनी रोजगार सहायक आणि सचिवांवर लाच घेतल्याचा आरोप केला होता. यावेळी रामबाई म्हणाल्या की, लाच घेण्यात काही चुक नाही. पण, लाच 1 हजार रुपयापर्यंत असवी. 5-10 हजारांची लाच घेणे चुकीचे आहे.

हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू

लाच घेतल्याचा आरोप
दरम्यान, गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदारानी रविवारी सातऊआ येथे जन चौपालचे आयोजन केले. रोजगार सहाय्यक निरंजन तिवारी आणि सचिव नारायण चौबे यांनाही या चौपालमध्ये बोलावले होते. जिथे लोकांनी आमदारासमोर रोजगार सहाय्यक आणि सचिवाबद्दल तक्रार केली. लोकांनी दोघांवर हजारो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. काही लोकांनी 5 हजार आणि काहींनी 10 हजार घेतल्याचा आरोप केला.

1 हजार रुपये घेतले असते तरी तक्रार नव्हती: आमदार

या चौपालमध्ये आमदार रामबाई यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच, थोडीफार लाच घेतील असती, तरी आम्ही तुम्हाला काही बोललो नसतो, असे म्हणाल्या. आम्हाला माहिती की, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो, पण इतका चालायला नको. एखादा हजार घेतले असते तरी चालले असते, पण 1.25 लाखांच्या घरासाठी 5 ते 10 हजार लाच घेणे अत्यंत चुकीचे आहे, असंही त्या म्हणाल्या.

Web Title: Madhya Pradesh BSP MLA Rambai says small amount of bribe is okay to take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.