नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने दोन लग्न केली आहे आणि आता त्याच्या या दोन बायका एकत्रच गायब झाल्या आहेत. व्यावसायिकाने दोघीही एकत्रच हरवल्याची तक्रार पोलिसात दिली, तेव्हा पोलीसही चक्रावले. पहिल्या पत्नीचे मामा करोड गावात राहतात. त्यांना एक मुलगीही आहे. मुलगी बऱ्याच दिवसांपासून आजीकडे जाण्यासाठी हट्ट करत होती. त्यानंतर पत्नीने आपल्या माहेरच्या घरी जाण्याचा बेत आखला. दुसरी पत्नीही त्यांच्यासोबत निघून गेली. त्या दोघीही त्यांच्या माहेराहून सोबतच निघाल्या. मात्र, त्या विदिशाला पोहोचल्याच नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाच्या एका पत्नीचं वय 26 तर, दुसरीचं वय 23 आहे. या दोघी त्यांच्या माहेरच्या घरी जात असल्याचं सांगून एकत्र घरातून निघून गेल्या होत्या. त्या त्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन निघून गेल्या होत्या. पतीने पत्नींविषयी चौकशी केली, तेव्हा कळलं की त्या त्यांच्या माहेरच्या घरातून पतीकडे निघाल्या होत्या. पण घरी पोहोचल्या नाहीत. त्यानंतर पतीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पती विदिशा येथील दुर्गा नगर परिसरात इलेक्ट्रिकल वस्तूंचा घाऊक व्यापारी आहे.
व्यावसायिकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दोन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. व्यावसायिकाचं म्हणणं आहे की, त्याच्या दोघी पत्नी 27 मार्च रोजी संध्याकाळी पहिल्या पत्नीच्या माहेरी विदिशाला निघाल्या होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. मात्र, त्या घरी परतल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत तिघीही जणी घरी न पोहोचल्यानं त्यांचा शोध सुरू झाला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. दोघी जणी कुठेच न मिळाल्याने या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली.
नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्हीही पत्नी आणि त्यांची मुलगी स्कूटीनं गेल्या होत्या. आता त्याचा फोनही बंद असल्याचं समजत आहे. पत्नी आणि मुली बेपत्ता झाल्यानंतर पतीनं याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. सध्या पोलिसांनी तिघांचाही शोध सुरू केला आहे. पण पोलिसांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की, या माणसाला दोन बायका कशा असू शकतात? दोघी एकत्र कसे जाऊ शकतात? आता मुलीसह कुठे गायब झाल्या असतीत? सध्या पोलिसांनी या तिघींनाही शोधण्यावर फोकस केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.