'इंडियन कोरोना म्हणणं पडलं महागात', कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर; भाजपाने केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:30 PM2021-05-24T14:30:18+5:302021-05-24T14:34:37+5:30
Case Registered Against Congress Kamalnath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,67,52,447 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,03,720 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंडियन कोरोना म्हणणं त्यांना आता महागात पडलं आहे.
कमलनाथ यांच्यावर खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. आता कोरोनाला जगात इंडियन कोरोना नावाने ओळखले जाईल असं म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपार्ह असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विळखा! "आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट जास्त"#coronavirus#CoronaSecondWave#Corona#CoronaVirusUpdate#WHOhttps://t.co/GigPdqvUbi
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. जानेवारी 2020मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला चायनीज कोरोना म्हटलं गेलं. चीनच्या लॅबमध्ये हा कोरोना तयार झाला आणि एका शहरातून हा कोरोना आला. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? इंडियन कोरोना येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक इंडियन कोरोना घेऊन येतील म्हणून त्यांना तिथेच रोखून ठेवलं आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जात आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं.
Corona Vaccine : "लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच कमी होतोय का?"#CoronavirusIndia#CoronaSecondWave#coronavirus#Corona#CoronaVaccine#CoronaVaccination#ICMRhttps://t.co/ss0BfTeYAd
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2021
कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस'?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती
कोरोना व्हायरसविरोधातील लस किती प्रभावी आहे? हा तपास करण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण सक्रीय आहेत? तसेच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि कोरोना संसर्ग रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल असण्याचा कालावधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! ...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं; मन सुन्न करणारी घटना#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/swlnjQ2YrV
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2021