शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

'इंडियन कोरोना म्हणणं पडलं महागात', कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर; भाजपाने केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:30 PM

Case Registered Against Congress Kamalnath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,67,52,447 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,03,720  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंडियन कोरोना म्हणणं त्यांना आता महागात पडलं आहे. 

कमलनाथ यांच्यावर खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. आता कोरोनाला जगात इंडियन कोरोना नावाने ओळखले जाईल असं म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपार्ह असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. जानेवारी 2020मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला चायनीज कोरोना म्हटलं गेलं. चीनच्या लॅबमध्ये हा कोरोना तयार झाला आणि एका शहरातून हा कोरोना आला. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? इंडियन कोरोना येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक इंडियन कोरोना घेऊन येतील म्हणून त्यांना तिथेच रोखून ठेवलं आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जात आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. 

कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस'?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती

कोरोना व्हायरसविरोधातील लस किती प्रभावी आहे? हा तपास करण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण सक्रीय आहेत? तसेच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि कोरोना संसर्ग रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल असण्याचा कालावधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी