110 KM प्रति तास वेगानं गेली ट्रेन, हादऱ्यानं रेल्वे स्थानकाची इमारत कोसळली, पाहा Photo
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:36 AM2021-05-27T11:36:08+5:302021-05-27T11:40:03+5:30
येथून पुष्पक एक्सप्रेस 110 किमी प्रति तास वेगाने गेली. या रेल्वेने बुधवारी सायंकाळी साधारणपणे 4 वाजता चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत क्रॉस केली.
बुऱ्हानपूर - मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथील चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत एका रेल्वे गाडीच्या वेगाने हादरे बसून कोसळल्याची घटना घडली आहे. ही रेल्वे गाडी तब्बल 110 किमी प्रति तास वेगाने येथून गेली. महत्वाचे म्हणजे, घटनेच्या वेळी या इमारतीत कुणीही नव्हते.
ही घटना नेपानगर ते असीगडदरम्यान घडल्याचे समजते. येथून पुष्पक एक्सप्रेस 110 किमी प्रति तास वेगाने गेली. या रेल्वेने बुधवारी सायंकाळी साधारणपणे 4 वाजता चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत क्रॉस केली. मात्र, रेल्वेचे हादरे ही इमारत सहन करू शकली नाही आणि कोसळली.
या फोटोंत दिसत आहे, की रेल्वेच्या या हादऱ्याने इमारतीच्या खिडकीच्या काचा तुटल्या आहेत. बोर्ड पडले आहेत. इमारतीचा पुढील भाग पडून स्थानक परिसरात पसरला आहे. ही घटना घडली तेव्हा, इमारतीच्या जवळपास काम करणाऱ्या लोकांचीही धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे सायंकाळी जवळपास जझनभर रेल्वे गाड्यांचे ऑपरेशन प्रभावित झाले होते.