ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 08:43 PM2022-10-20T20:43:50+5:302022-10-20T20:43:58+5:30

मामा दोन तास रस्त्यावर भटकत राहिला; अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली

Madhya Pradesh: Chhatarpur ambulance shortage; Uncle took daughter's dead body in bus | ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला

ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला

googlenewsNext

छतरपूर: मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयात एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, पण रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्यामुळे मुलीच्या मामाने मृतदेह खांद्यावर उचलून नेला. बरेच अंतर चालल्यानंतर तो बस पकडून आपल्या गावी पोहोचला.

मामाने सांगितली आपबीती
छतरपूर जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या बजना येथील पाटण गावात राहणारे मुलीचे मामा किशोरी अहिरवार यांनी सांगितले की, "बुधवारी सकाळी 10 वाजता माझी भाची प्रीती तिच्या दोन मैत्रिणींसोबत नदीच्या काठावर खेळत होती. मी सुद्धा तिथेच आंघोळ करत होतो. तो परिसर चिखलमय झाला होता, ज्यामुळे प्रीती चिखलात गाडली गेली. तिच्यासोबत खेळणाऱ्या दोन मैत्रिणी रडू लागल्या. तिचा आवाज ऐकून मी पोहोचलो आणि प्रीतीला तात्काळ रुग्णालयात आणले."

2 तास भटकलो, पण रुग्णवाहिका मिळाली नाही
"तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला छतरपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, वाटेतच तिचा मृत्यू झाला. मी मृतदेह घरी आणण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागितली, पण मला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. मी 2 तास हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे भटकलो. रात्र झाली होती, म्हणून मी भाचीला चादरीत गुंडाळून खांद्यावर ठेवले अन् पायी चालत निघालो. चौकातून रिक्षा घेऊन नाक्याला पोहोचलो आणि तिथून बसने गावी आलो."

अधिकारी जबाबदारीतून पळ काढत आहेत
स्थानिक आमदाराने रुग्णालयाला एक रुग्णवाहिका दिली होती. पण ती रुग्णवाहिका गरजुंना मिळत नाही. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. जीएल अहिरवार यांनी सांगितले की, आमदाराने दिलेली रुग्णवाहिका एका क्लबच्या स्वाधिन दिली आहे, तो क्लब रुग्णवाहिका चालवतो. त्यांनाच याचे कारण माहित असेल. तर, त्या क्लबचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कोणताच व्यक्ती मदत मागायला आला नाही.

राज्यात खराब आरोग्य व्यवस्था
विशेष म्हणजे, मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

  • सिंगरौली जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका बापाने नवजात मुलाचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून नेला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
  • 10 सप्टेंबर रोजी पन्नाच्या रुग्णालयात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यानंतर वडिलांनी मुलाचा मृतदेह गाडीवर टाकून गावी नेला. 
  • 3 सप्टेंबर रोजी सीहोर आणि शाजापुर जिल्यातील नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह गाडीवर टाकून न्यावा लागला.
  • 31 जुलै रोजी शहडोलच्या गोडारू गावात एका महिलेचा मृत्यू झाला, रुग्णवाहिका नसल्यामुळे मुलाने आईचा मृतदेह गाडीवर टाकून नेला.

Web Title: Madhya Pradesh: Chhatarpur ambulance shortage; Uncle took daughter's dead body in bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.