भोपाळ : मध्य प्रदेशातील आंदोलनात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती शांत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च उद्या, शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: शिवराजसिंह चौहान यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली.राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आपण शनिवारी कार्यालयात न जाता भोपाळमधील दशेहरा मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, त्यावेळी आपण शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चाही करू, त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आपण मैदानात उपोषणास बसणार आहोत, असे चौहान म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी जाळपोळ व हिंसाचार केला, असे सांगून ते म्हणाले की, या प्रश्नाचे राजकारण केले जाऊ नये, अशी आपली इच्छा आहे. आपले उपोषण म्हणजेही राजकारण नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. (वृत्तसंस्था)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आजपासून उपोषणाला
By admin | Published: June 10, 2017 2:47 AM