छिंदवाडा : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुन्हा एकजा भाजपावर हल्लाबोल करताना सर्जिकल स्ट्रइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, छिंदवाड्यात आयोजित कार्यक्रमात कमलनाथ यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला.
सर्जिकल स्ट्राइक कधी आणि कुठे केला, असा सवाल करत कमलनाथ यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "यांच्या (भाजपा) लक्षात नाही की इंदिराजींचे सरकार असताना 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी समर्पण केले होते. ते याबाबत काहीच बोलत नाहीत. ते म्हणतात, आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला. कोणता सर्जिकल स्ट्राइक केला? कधी आणि कुठे सर्जिकल स्ट्राइक केला? याबाबत देशाला स्पष्टपणे सांगा." याचबरोबर, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही कमलनाथ यांनी टीका केली. शिवराज सिंह चौहान हे फक्त श्रेय घेण्याचे राजकारण करत आहेत, असे कमलनाथ म्हणाले.
दरम्यान, याआधी कमलनाथ यांनी सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष हटविण्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रवाद आणि पाकिस्तानवर भाष्य करतात. मात्र, तरूण आणि शेतकऱ्यांबाबत काहीच बोलत नाही. देश चालविणे आणि बोलणे यामध्ये मोठा फरक असतो, असे कमलनाथ यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी
Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'
Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर
राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल