भोपाळ - जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मध्य प्रदेश सरकारने प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गेल्या १८० दिवसांत आमच्या राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची कामे पार पाडली आहेत. उत्तम राज्यकारभाराला आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. लोकांना आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयांत चकरा माराव्या लागू नयेत, विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणारा विलंब टाळावा, सर्व कामे योग्य मुदतीत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जावीत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (वा.प्र)
‘यंदा गोवंश रक्षण वर्ष’यादव यांचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने पूर्ण झाले. त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी पुनरुच्चार केला. यादव म्हणाले की, मध्य प्रदेशात यंदाचे वर्ष गोवंश रक्षण वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. हे वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू झाले. गोशाळांना देण्यात येणाऱ्या निधीत राज्य सरकारने दुप्पट वाढ केली आहे.