शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

"भारत महान नाही तर बदनाम झालाय, याला मोदी सरकार जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 6:16 PM

madhya pradesh congress chief kamal nath : निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

ठळक मुद्देपत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मैहरमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या समाज सेवकाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर कमलनाथ यांनी सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.  भारत महान नाही बदनाम देश म्हणून ओळखला जात आहे. परिस्थिती अशी आहे की, विदेशातील भारतीय टॅक्सी चालकांच्या गाड्यांमध्ये प्रवासी बसण्यास तयार नाहीत. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे केंद्र सरकार जबाबदार आहे, असे म्हणत कमलनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. (madhya pradesh congress chief kamal nath said india is not great now india is infamous)

मोदी सरकार ३० मे रोजी सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. या निमित्ताने मोदी सरकारने जनतेला उत्तरं द्यायला हवीत की देश केवळ घोषणांवर चालणार आहे का? रोजगार देणार होतात त्याचे काय झाले? महागाईचे काय झाले?, याची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. याशिवाय, पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

'मी कोरोना माफियांविरोधात शुद्धसाठी युद्ध सुरु केले. मात्र आज भाजपाचे नेते व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत आहेत. ज्या खड्ड्यात राज्याला ढकलले जात आहे तिथून राज्य बाहेर काढणे आव्हानात्मक आहे. मध्य प्रदेशची ७० टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्य वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. खालच्या स्तरावरील मध्यम वर्गीय आता गरीब झालेत आणि गरीबांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे', असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. दुसऱ्या लाटेची माहिती अनेक महिन्यांपासून होती, मात्र त्यासंदर्भातील तयारी करण्यात आली नाही. निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

'धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते'याचबरोबर, प्रश्न विचारल्यावर देशद्रोही आणि सत्य दाखवले तर एफआयआर दाखल केले जाते, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री शिवराज हे सर्व आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत? किती जणांचे लसीकरण झाले हे उघडपणे का सांगत नाही?, असे सवाल कमलनाथ यांनी विचारले आहेत. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपाकडे धर्माची ठेकेदारी देण्यात आलेली नाही. आम्ही सुद्धा धार्मिक आहोत पण आम्ही दिखावा करत नाही. मी कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते, अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या