CoronaVirus : धक्कादायक! कोरोना संक्रमित युवक लग्नात झाला सामील, अख्खं गाव करावं लागलं सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:43 PM2021-05-06T18:43:40+5:302021-05-06T18:44:50+5:30
यासंदर्भात माहिती मिळताच प्रशासन हादरले आणि जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी गाव सील करत रेड झोन म्हणून घोषित केले आहे. (coronaVirus)
निवाडी - मध्येप्रदेशातील निवाडी (niwari) जिल्ह्यात असलेल्या लुहरगुवा गावातील अरुण मिश्रा या युवकाचा कोरोना रिपोर्ट 27 एप्रिलरोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तरीही तो होम आयसोलेशनमध्ये गेला नाही. उलट तो 29 एप्रिलरोजी गावात झालेल्या एक लग्न समारंभात सहभागी झाला. या लग्न समारंभात त्याने लोकांना जेवणही वाढले. एवढेच नाही, तर दुसऱ्या दिवशी तो वरातीत उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील भुचेरा गावालाही गेला. तेथे तो अनेकांच्या संपर्कात आला आणि नवरदेव-नवरीसोबत फोटोही काढले. यानंतर गावातील अेक लोकांची तब्बेत बिघडली आहे. (Madhya pradesh corona positive person attended wedding around 40 people infected in luharguwan village in niwari)
CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!
गाव रेड झेन म्हणून घोषित, पोलीसही तैनात -
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावल्याने जवळपास 60 लोकांनी कोरोना टेस्ट केली. यांपैकी जवळपास 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच प्रशासन हादरले आणि जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी गाव सील करत रेड झोन म्हणून घोषित केले आहे. एवढेच नाही, तर या गावाला जोडले गेलेले सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. याशिवाय लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनाही गावात तैनात करण्यात आले आहे. या घटनेनंतर जवळपासच्या गावातही भीतीचे वातावरण आहे.
पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊनही फिडबॅक घेतला नाही -
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अशी घटना समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. यात संबंधित तरुणाची तर चूक आहेच. पण प्रशासनाचीही चूक समोर आली आहे.
CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणामुळे लोकांत कोरोना पसरला त्याने 24 एप्रिललाच सॅम्पल दिले होते. 27 तारखेला त्याचा रिपोर्ट आला होता. मात्र, तरीही प्रशासनाने ना संबंधित तुरणाची चौकशी केली ना त्याला काही औषधे दिली. या प्रकरणी निवाडी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.