शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 5:24 PM

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (CoronaVirus)

भोपाळ - कोरोना व्हायरसने मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रचंड थैमान घातले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असून वैद्यकीय साधनांचीही कमतरता भासू लागली आहे. राजधानी भोपाळमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गेल्या 24 तासांत भोपाळमध्ये 1681 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 112 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी रेकॉर्डवर केवळ 4 जणांचाच मृत्यू झाला आहे. (Madhya Pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal)

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. भोपाळमधील पॉझिटिव्हिटी रेट 29 टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे. भोपाल, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेर येथे अंत्य संस्कारासाठी अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. स्मशान भूमीवत एका पाठोपाठ एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

CoronaVirus : कुंभमेळ्यात कुणामुळे पसरला कोरोना? आता आखाडेच आले 'आमने-सामने'

एका दिवसातील मृतांची संख्या संख्या 100 पार -भोपाळच्या सुभाष नगर विश्रामघाटावर गुरुवारी 50 मृतदेह आले. यांतील 30 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदा विश्रामघाटावर 88 मृतदेह आले. यांतील 72 जणांवर कोरोना प्रोटेकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, झदा कब्रस्तान येथेही 17 पैकी 10 मृतदेह कोविड प्रोटोकॉल प्रमाणे दफन करण्यात आले. म्हणजेच एकूण 112 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

काँग्रेसचा सरकारवर आकडे लपवण्याचा आरोप - कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे. एवढेच नाही, तर यामुळे सरकारवही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यातच विरोधक सरकारवर सातत्याने मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस नेते अजय सिंह यादव यांनी सरकारवर मृतांच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत गंभीर नाही, असे अजय सिंह यांनी म्हटले आहे. तर, आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी विरोधकांच्या प्रश्नावर पलटवार करत, सरकार मृतांचा आकडा लपवत नाही. तसेच ज्या लोकांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. त्यांनाही संशयित मानले जात आहे, असे सारंग यांनी म्हटले आहे. 

CoronaVirus Update: कोरोनाचा कहर! देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट

24 तासांत 10 हजारहून अधिक केस -राज्यात गुरुवारी 10,166 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, 3,970 जणांनी कोरोनावर मात केली आहे. येथे आतापर्यंत 3.73 लाख सक्रीय रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 3.13 लाख रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसBJPभाजपा