नववर्षाची पार्टी करण्यासाठी निघाले, चार तरुणांचे सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडले, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:09 IST2025-01-05T09:09:09+5:302025-01-05T09:09:29+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका घराच्या सेप्टिक टँकमध्ये चार मृतदेह सापडले आहेत.

नववर्षाची पार्टी करण्यासाठी निघाले, चार तरुणांचे सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडले, घातपाताचा संशय
मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका घराच्या सेप्टिक टँकमध्ये चार मृतदेह सापडले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणांबाबत शनिवारी माहिती मिळाली होती. त्यानंतर सेप्टिक टँक उघडून पाहण्यात आला. तेव्हा त्यामध्ये चार तरुणांचे मृतदेह सापडले. आता या घटनेबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे. तसेच मृत तरुणांच्या नातेवाईकांकडेही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मृत चारही तरुण हे मित्र होते. तसेच ते नववर्षानिमित्त पार्टी करण्यासाठी आपल्या घरामधून निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात हत्येच्या संदर्भाने तपास सुरू आहे.