'जो करेगा वो भरेगा'! भावावर FIR झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:49 AM2023-02-22T08:49:08+5:302023-02-22T08:50:20+5:30
बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत.
सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची सर्वत्र जबरदस्त चर्चा सुरू आहे. ते कधी हिन्दू राष्ट्र करण्यासंदर्भातील वक्तव्य, तर कधी लोकांच्या मनातील गोष्टी ओळखण्याच्या टेक्निकमुळे चर्चेत असतात. ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी याचे कारण काही चमत्कार नाही, तर त्याच्या भावाविरोधात नोंदवली गेलेली FIR आहे.
बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रियाही आली आहे. 'आपण असत्यासोबत नाही. जो करेल तो भरेल. या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडू नये,' असे धिरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले बागेश्वर शास्त्री? -
यासंपूर्ण प्रकरणावर बोलताना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, आपण असत्यासोबत नाही. जो करेल तो भरेल. ते म्हणाले, यासंदर्भात आपल्या समजले. याची कायदेशीर निःपक्षपातीपणे सखोल चौकशी व्हावी. आपण कदापी चुकीच्या गोष्टींसोबत नाही. प्रत्येक विषय आपल्यासोबत जोडून नये. आपण सनातन, हिंदुत्व आणि श्री बागेश्वर बालाजींच्या सेवेत अखंडपणे कार्यरत आहोत. हा प्रकार आमच्यासोबत जोडला जाऊ नये.
व्हायरल व्हिडिओमधून समोर आला प्रकार -
या व्हिडिओमध्ये आरोपी शालिग्राम तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन लोकांना धमकावताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. याच वेळी, तो एका व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहे. याशिवाय, राई (बुंदेलखंडचे लोकनृत्य) चालणार नाही, असे म्हणतानाही दिसत आहे. या गडा गावात केवळ बागेश्वर धामचे गाणेच वाजणार. मात्र तेथील लोकांनी बागेश्वर धामचे गाणे वाजविण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
या संपूर्ण प्रकारावर बोलताना पोलीस अधीक्षक सचिन वर्मा म्हणाले, धार्मिक गाणी वाजवण्यावरून वाद झाला आणि पिस्तूल दाखविण्यासारखा प्रकर समोर आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे. तपासानंतर, संपूर्ण प्रकार स्पष्ट होईल.