शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 7:48 PM

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

PM Narendra Modi Oath Ceremony :नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी शपथ घेतली. यानंतर मध्य प्रदेशात मामा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलं. शिवराज सिंह चौहान आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चौहान यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. १९९० साली पहिल्यांदा बुधनीमधून निवडणूक जिंकून आमदार झालेले शिवराज सिंह चौहान यांची गणना भाजपच्या ताकदवान नेत्यांमध्ये केली जाते. नव्वदच्या दशकात अखिल भारतीय केशरिया वाहिनीचे संयोजक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९९१ मध्ये विदिशामधून दहाव्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा खासदार झाले. १९९६ मध्ये चौहान ११ व्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले. यानंतर त्यांनी १९९६ ते १९९७ या काळात मध्य प्रदेशात पक्षाचे सरचिटणीसपद भूषवले होते.

शिवराज सिंह चौहान १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये विदिशा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी २९ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि २००८ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. १२ डिसेंबर २००८ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. १४ डिसेंबर २०१३ रोजी तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर  २०२० चौथ्यांदा मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदावरुन बाजूला होत  त्यांना खासदारकीसाठी मैदानात उतरवण्यात आले आणि त्यानंतर शिवराज सिंह आठ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश