मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाच्या इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:56 IST2019-06-10T19:56:06+5:302019-06-10T19:56:54+5:30
आगीमुळे न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.

मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाच्या इमारतीला आग
जबलपूर : मध्यप्रदेशातील जबलपूर येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळेन्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान,आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीला सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग उच्च न्यायालयाच्या साउथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावर लागली. आग लागल्याचे वृत्त समजताच न्यायालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली आणि परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
Madhya Pradesh: Fire breaks out at Jabalpur High Court; more details awaited. pic.twitter.com/VsSbUVHzze
— ANI (@ANI) June 10, 2019
या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी ही आग शॅार्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत इमारतीमधील जुने फर्निचर जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील बलियामध्ये सुद्धा न्यायालयाला आग लागल्याची घटना घडली होती. बलियाच्या दिवाणी न्यायालयात आग लागली होती. या आगीत अनेक कायदेशीर कागदपत्रे जळून खाक झाली होती.