भोपाळ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. राज्यपाल लालजी टंडन 10 दिवसांच्या सुटीवर लखनऊला गेले होते. तेथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
लालजी टंडन यांना युरिनरी इन्फेक्शन आणि ताप आला होता. यामुळे त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टंडन यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून कोरोनाची टेस्टही करण्यात आली आहे. कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.
मेदांताच्या डॉक्टरांनी सांगितले की, टंडन यांची प्रकृती ठीक असून अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. टंडन सुटीवर असून 19 जूनला ते भोपाळला परतणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या....
मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती
आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल