Coronavirus: राजकारणामुळे सरकारचं कोरोना प्रतिबंधांकडे दुर्लक्ष, 'या' जिल्ह्यातील लोकांनी स्वतःच लावला लॉकडाउन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:06 PM2021-04-12T16:06:40+5:302021-04-12T16:08:45+5:30
येथील लोकांनी लॉकडाउनचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास हा दोन दिवसांचा लॉकडाउन आणखीही वाढविला जाऊ शकतो, असे येथील लोक म्हणत आहेत. (self imposed lockdown)
भोपाळ - मध्यप्रदेशात (Madhya pradesh) कोरोनाची दुरसी लाट हाताबाहेर जाताना दिसत आहे. येथे सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील अनेक शहरांत विकेंड लॉकडाउन लावण्यात आला आहे. मात्र, पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील दमोह जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असतानाही शिवराज सरकारने लॉकडाउन लावला नाही. यानंतर दमोहच्या लोकांनी एक आदर्श ठेवत सरकारचा आदेश नसतानाही दोन दिवसांचा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Madhya pradesh hinota in damoh district goes into self imposed lockdown amid corona virus surge shops shut for two days)
सरकारचे हात वर, लोकांनी संभाळली जबाबदारी -
संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाउन लावण्यात आला. पण, दमोह जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असतानाही विकेंड लॉकडाउन का लावण्यात आला नाही? असा प्रश्न मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारला असता, ते म्हणाले, दमोह त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही. पोट निवडणुकीमुळे दमोह, निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येते. त्यामुळे सरकारने तेथे लॉकडाउन केलेला नाही. दमोह जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे यामुळे येथील स्थिती अधिक गंभीर होत असल्याचे पाहून या जिल्ह्यातील एका गावातील लोकांनी स्वतःच लॉकडाउन लवला आहे.
स्वेच्छेने घरात बंद, बंद केली दुकानं -
दमोह जिल्ह्यातील हटा ब्लॉकमधील हिनोता येथील लोकांनी प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहताच दोन दिवसांचा विकली लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनदरम्यान हिनोतामधील बाजार पूर्णपणे बंद होते. तसेच लोकही आपल्या घरातच आहेत.
Madhya Pradesh: Locals in Hinota town of Damoh district observed self-imposed on Saturday & Sunday in view of rising COVID cases in the state.
— ANI (@ANI) April 12, 2021
"Shopkeepers have voluntarily decided to keep their shops shut for two days. It can be further extended," a local said yesterday. pic.twitter.com/N0Y9DUycRB
आवश्यकता भासल्यास लॉकडाउन वाढवणार -
हिनोताच्या लोकांनी म्हटले आहे, कोरोनाचा फैलाव पाहता चिंता वाढली आहे. त्यांच्या परिसरातही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही, तर कोरोनाने काही जणांचा बळीही घेतला आहे. यामुळे आमच्याकडे केवळ लॉकडाउन हाच एकमेव पर्याय होता. येथील लोकांनी लॉकडाउनचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास हा दोन दिवसांचा लॉकडाउन आणखीही वाढविला जाऊ शकतो.