"साहेब, आम्हाला मरू द्या"; बाप आणि हतबल मुलींची एसपींकडे मागणी; डोळे पाणावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 11:40 AM2023-07-08T11:40:06+5:302023-07-08T11:47:32+5:30

एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासह इच्छामरणासाठी पोलिस अधीक्षकांकडे (एसपी) परवानगी मागितली आहे.

madhya pradesh husband daughters appeals for self killing before sp panful story of woman murder euthanasia | "साहेब, आम्हाला मरू द्या"; बाप आणि हतबल मुलींची एसपींकडे मागणी; डोळे पाणावणारी घटना

फोटो - news18 hindi

googlenewsNext

मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासह इच्छामरणासाठी पोलीस अधीक्षकांकडे (एसपी) परवानगी मागितली आहे. त्या व्यक्तीच्या मुलींनी आरोप केला आहे की त्यांच्या आईची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी महिलेसोबत काहीतरी चुकीचं घडलं होतं. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे मुलींचे म्हणणे आहे. मात्र, कुठेही सुनावणी होत नाही. याप्रकरणी नरसिंगपूरचे एसपी सांगतात की, प्रकरणाचा तपास सातत्याने सुरू आहे. अनेक डीएनए चाचण्या झाल्या. 

7 जुलै रोजी दीपक जाटव आपल्या चार मुली आणि एका मुलासह नरसिंगपूर एसपी कार्यालयात पोहोचले. त्यांनी येथील एसपीकडे अर्ज केला. दीपकच्या मुलींनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आमच्या आईच्या हत्येला बराच काळ लोटला आहे. आम्ही एसपी, आयजी, टीआय या सर्वांना अर्ज दिले आहेत. मात्र, कुठेही सुनावणी होत नाही. आम्ही खूप अस्वस्थ आहोत. वारंवार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. या सर्व गोष्टींना आपण कंटाळलो आहोत. आमच्या आईला न्याय हवा आहे.

8 महिन्यांपूर्वी नरसिंगपूरच्या करेली टाउनशिपमध्ये चारा कापण्यासाठी गेलेली महिला सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्रभर उसाच्या शेतात तपासणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यावेळी पोलिसांनी हत्येची शक्यता व्यक्त केली होती.

महिलेच्या कानातून आणि तोंडातून रक्तस्त्राव झाल्याच्या खुणा आढळून आल्या. हातावरची त्वचा ताणलेली होती. दुसरीकडे एफएसएल टीमही तपासात गुंतली. पोलिसांनी जनरेटरच्या सहाय्याने रात्रभर उसाच्या शेतात लाइट टॉवर उभारून या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळीही महिलेचा शोध घेत असताना उसाच्या शेतातून कोणीतरी पळून गेल्याचा आवाज आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: madhya pradesh husband daughters appeals for self killing before sp panful story of woman murder euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.