Viral News: हिंदीमध्ये एक म्हण आहे, 'देने वाला जब भी देता, देता छप्पड़ फाड़ के' म्हणजे देणारा देतो तेव्हा खूप काही देतो. ही म्हण मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्या तरुणाचे नशीब रातोरात चमकले आणि तो कोट्यधीश झाला.
शहाबुद्दीन मन्सूरी नावाच्या तरुणाने काही तासांतच ऑनलाइन गेमिंग अॅपद्वारे कोट्यवधी रुपये कमावले. शहाबुद्दीन 2 वर्षांपासून ऑनलाइन गेमिंग अॅपवर टीम तयार करुन आपले नशीब आजमावत होता. रविवारी IPL मध्ये कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यात शहाबुद्दीनने 49 रुपयांचा गेम लावला आणि पहिले स्थान मिळवले. पहिला क्रमांक पटकावल्यावर त्याला बक्षीस म्हणून 1.50 कोटी रुपये मिळाले.
एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर तो आणि त्याचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. सध्या शहाबुद्दीनने 1.5 कोटींपैकी 20 लाख रुपये काढले आहेत. यातून 6 लाख रुपये कर वजा करुन 14 लाख रुपये त्याच्या खात्यात येतील. शहाबुद्दीन सांगतो की, या बक्षिसाच्या रकमेतून आधी तो स्वतःचे घर बांधणार आहे आणि नंतर दुसरा काही व्यवसाय सुरू करणार आहे.