"भारतीय संस्कृतीनुसार फाटके कपडे घालणं म्हणजे अपशकुन असतो", भाजपा मंत्र्यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:25 AM2021-03-23T10:25:52+5:302021-03-23T10:29:42+5:30
BJP Usha Thakur Comment Over Ripped Jeans : मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला. यानंतर आता मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"फाटके कपडे घालणं हा अपशकुन असतो" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. संस्कृती आणि परंपरा मानणाऱ्यांना अशापद्धतीचे कपडे परिधान करणं आवडत नाही असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांना कपड्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकूर यांनी "माझं व्यक्तीगत मत तर हे आहे की फाटके कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीप्रमाणे अपशकून मानलं जातं." ठाकूर या भोपाळमधील एका संग्रहालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.
रावत यांच्या विधानामुळे नवा वाद, ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग होतोय जोरदार ट्रेंडhttps://t.co/XJe4MSMrYe#TirathSinghRawat#BJP#Uttarakhand#rippedjeanspic.twitter.com/wBFIptupOi
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2021
"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम
"तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की आपली आजीसुद्धा कपडे थोडे जरी फाटले असतील तर ते वापरू नको असं सांगायची. आईसुद्धा असे कपडे वापरणं बंद कर असा सल्ला द्यायची" असं देखील उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे.
"आपल्याकडे वेळ असताना दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल", तीरथ सिंह रावत यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधानhttps://t.co/TWyuIeCxlZ#TirathSinghRawat#TirathSRawat#Uttarakhand#UttarakhandCM#BJP#rippedjeanspic.twitter.com/COUx2RLkTH
— Lokmat (@MiLOKMAT) March 22, 2021
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."
तीरथ सिंह रावत यांची मुक्ताफळं, पुन्हा एकदा आले चर्चेतhttps://t.co/a1ADtf7nzP#TirathSinghRawat#TirathSRawat#UttarakhandCM#Uttarakhand#America#Indiapic.twitter.com/pmfNbbigm0
— Lokmat (@MiLOKMAT) March 22, 2021
"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती.
CoronaVirus News : भाजपा आमदाराचं कोरोना संसर्गासंदर्भात वादग्रस्त विधान https://t.co/GADRb0iE66#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#BJP#GovindPatel#GujaratCoronaUpdatepic.twitter.com/joamO9Vf6C
— Lokmat (@MiLOKMAT) March 22, 2021