Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 08:50 AM2018-11-28T08:50:11+5:302018-11-28T18:21:39+5:30

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पूर्ण झाले. या विधानसभा निवडणुकीत भाजपा ...

Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान | Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

Next

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पूर्ण झाले. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी 2899 उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. तर, मिझोरमध्ये 40 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये आठ राजकीय पक्षांचे एकूण 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत. मध्य प्रदेशमध्ये 74.61 % टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदानाची नोंद आहे.  

 

LIVE

Get Latest Updates

06:22 PM

मध्य प्रदेशमध्ये 6 वाजेपर्यंत 74.61 टक्के मतदान झाले आहे.

05:57 PM

मध्य प्रदेशमध्ये 65 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान झाले आहे. 

05:45 PM

मध्य प्रदेशमध्ये 4.30 वाजेपर्यंत 62 टक्के मतदान, 1545 ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

05:35 PM

मतदारांना नोटा वाटणाऱ्या भाजप नेत्याला गावकऱ्यांनी पकडले, 2.5 लाख रुपये जप्त

05:10 PM

मध्य प्रदेशमध्ये 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान, बिघाड झालेल्या 1545 ईव्हीएम मशिन बदलल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट.

03:26 PM

मध्य प्रदेशात तीन वाजेपर्यंत 50 टक्के मतदान



 

03:22 PM

मिझोरममध्ये तीन वाजेपर्यंत 58 टक्के मतदान



 

 

03:02 PM

मध्य प्रदेशात दोन वाजेपर्यंत 34.99 टक्के मतदान


 

02:12 PM

मिझोरममध्ये 106 वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावला.



 

02:09 PM



 

01:39 PM

मिझोरमध्ये एक वाजेपर्यंत 49 टक्के मतदान



 

01:31 PM

मध्य प्रदेशात अकरा वाजेपर्यंत 21 टक्के मतदान



 

11:58 AM

मिझोरममध्ये 11 वाजेपर्यंत 29 टक्के मतदान झाले.



 

 

11:54 AM

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय रथात बसून मतदान केंद्रावर दाखल

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथे मतदानासाठी घोड्याच्या रथामध्ये बसून आले. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.



 

11:50 AM

जनतेच्या आशिर्वादाने काँग्रेस सरकार स्थापन करेल - ज्योतिरादित्य सिंधिया 

जनतेच्या आर्शिर्वादाने 11 डिसेंबरला काँग्रेस सरकार स्थापन करेल, अशी मी तुम्हाला खात्री देतो, असे काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया सांगितले. ग्वाल्हेर येथे मतदान केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 



 

11:39 AM

10 लाखांची आर्थिक मदत जाहीर

मध्य प्रदेशात निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या तीन निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या अधिकाऱ्यांच्या कुंटुंबीयांना निवडणूक आयोगाने 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. 



 

11:31 AM

भोपाळमधून भाजपाचे प्रचार साहित्य पोलिसांकडून जप्त

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पोलिसांकडून भाजपाचे प्रचार साहित्य जप्त करण्यात आले. मतदान केंद्राच्या २०० मीटर आतमध्ये भाजपाचे कार्यकर्ते प्रचार करीत होते. यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.



 

10:19 AM

मध्यप्रदेशातील अगर मालवा येथील 101 वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावला.



 

10:19 AM

मध्यप्रदेशातील गुना येथील मतदान केंद्रावर एका निवडणूक अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. 



 

09:44 AM

मिझोरममध्ये 9 वाजेपर्यंत 15 टक्के मतदान



 

09:41 AM

शिवराज सिंह चौहान केले मतदान

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मतदान केले. शिवराज सिंह चौहान बुधनी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी ते म्हणाले,  आम्हाला 100 टक्के विश्वास आहे की, भाजपा बहुमताने सरकार स्थापन करेल. आमचा 200 जागा जिंकण्याचा मानस आहे, यासाठी लाखों कार्यकर्ते काम करत आहेत. 



 

09:28 AM

भोपाळमध्ये तरुणींनी मतदानाचा हक्क बजावला



 

09:15 AM

मध्य प्रदेशच्या मंत्री यशोधरा राजे सिंदिया यांनी शिवपुरी येथे मतदान केले.



 

09:12 AM

छिंदवाडामध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केले मतदान



 

09:06 AM

मध्य प्रदेशातील ग्वालिवार जिल्ह्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड.



 

09:04 AM

मिझोरममध्ये मतदान केल्यानंतर नागरीक.



 

09:00 AM

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मतदान करण्यापूर्वी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. 



 

 

 

08:56 AM

मध्य प्रदेशात 230 जागांसाठी मतदान सुरु, इंदोर मतदान केंद्रात मतदान करताना नागरीक



 

08:51 AM

मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु



 

Web Title: Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.