भोपाळ : मध्य प्रदेशातील मुस्लीम समाजाचे एक वरिष्ठ अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण, हे अधिकारी आपले असे नाव शोधत आहेत की, त्यामुळे त्यांची ओळख त्यांना लपवता येऊ शकेल. यासाठी त्यांनी सोशल मीडियातील ट्विटरवर अनेक पोस्ट लिहिल्या आहेत. नियाज खान असे या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे. नियाज खान यांनी मॉब लिंचिंग सारख्या घटनांमुळे चिंता व्यक्त करत ट्विट केले आहे. यात त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी नवीन नाव शोधत असल्याचे म्हटले आहे.
नियाज खान यांनी शनिवारी ट्विटरवर लिहिले आहे, 'नवीन नाव मला हिंसक जमावापासून वाचवेल. जर माझ्याजवळ टोपी, कुर्ता आणि दाढी नाही आहे, तर मी जमावापासून माझे खोटे नाव सांगून सहज निघू शकतो. मात्र, जर माझा भाऊ पारंपरिक कपडे परिधान करत आहे आणि दाढी ठेवत आहे, तर तो सर्वात गंभीर परिस्थितीत आहे.'
याचबरोबर, नियाज खान आणि आणखी एका ट्विटमध्ये वेगवेगळ्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले,' कोणतेही संस्था आम्हाला वाचविण्यासाठी सक्षम नाही आहे, त्यामुळे नावाला स्विच करणे चांगले आहे.' याशिवाय, 'माझ्या समाजातील बॉलिवूड अभिनेत्यांना सुद्धा आपल्या चित्रपटांच्या सुरक्षतेसाठी नवीन नावांचा शोध घेणे गरजेचे आहे. आता तर टॉप स्टार्सच्या चित्रपट सुद्धा फ्लॉप होत आहेत. त्यामुळे त्यांची याचा अर्थ समजून घेतला पाहिजे' असे ट्विट नियाज खान यांनी केले आहे.