Madhya Pradesh: बलात्कारी, दहशतवाद्यांना माफी नाही, मध्य प्रदेश सरकारच्या नव्या धाेरणातील प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:17 AM2022-09-03T06:17:04+5:302022-09-03T06:17:27+5:30
Madhya Pradesh: बलात्कार, सामूहिक बलात्कार, दहशतवाद तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यातील दाेषींना अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यांना शिक्षेमध्ये काेणत्याही प्रकारचा दिलासा किंवा माफी मिळणार नाही.
- अभिलाष खांडेकर
भाेपाळ : बलात्कार, सामूहिक बलात्कार, दहशतवाद तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यातील दाेषींना अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यांना शिक्षेमध्ये काेणत्याही प्रकारचा दिलासा किंवा माफी मिळणार नाही. मध्य प्रदेश सरकार जन्मठेपेच्या कैद्यांबाबत नवे धाेरण आखणार आहे. त्यात हे मुद्दे ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक बैठक झाली. त्यात विविध गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भाेगणाऱ्या कैद्यांच्या सुटकेबाबत राज्य सरकारच्या नव्या धाेरणाबाबत चर्चा झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या धाेरणात गंभीर गुन्ह्यातील दाेषींना दिलासा मिळणार नाही. दहा राज्यांच्या धाेरणांचा अभ्यास करूनच हे धाेरण तयार केले आहे. बिल्किस बानाे प्रकरणातील ११ दाेषींची सुटका झाल्यानंतर या मुद्द्यावर देशभरात चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशने हे धाेरण आखले आहे. असे गुन्हेगार अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगातच राहिले पाहिजे, असे चाैहान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.