Madya Pradesh Plane Crash: मंदिराच्या कळसावर विमान कोसळलं, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:28 PM2023-01-06T15:28:50+5:302023-01-06T15:32:41+5:30

दाट धुक्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Madhya Pradesh, plane crash on temple in Rewa district, pilot died and trainee injured | Madya Pradesh Plane Crash: मंदिराच्या कळसावर विमान कोसळलं, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू

Madya Pradesh Plane Crash: मंदिराच्या कळसावर विमान कोसळलं, भीषण अपघातात पायलटचा जागीच मृत्यू

googlenewsNext

भोपाळ-मध्य प्रदेशातील रीवा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक प्रशिक्षणार्थी विमानाचा भीषण अपघात झाला. धुक्यामुळे विमान थेट एका गावातील मंदिरावर कोसळले. या विमान अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला, तर प्रशिक्षणार्थी पायलट गंभीर जखमी झाला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंदिराच्या घुमटावर विमान कोसळले
चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात हा विमान अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी विमान काल रात्री साडेअकराच्या सुमारास एका मंदिराच्या घुमटावर आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. विमानाला धडकताच आग लागली. या अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमी इंटर्नवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज
अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र प्राथमिक तपासात अपघाताचे कारण धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्यामुळे पायलटला उंचीचा अंदाज आला नाही आणि त्याचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले. या अपघातात कॅप्टन विमल कुमार (54) यांचा मृत्यू झाला, तर सोनू यादव (22) हा प्रशिक्षणार्थी जखमी झाला.

खासगी कंपनीचे विमान
चोरहाटा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अवनीश पांडे यांनी सांगितले की, रीवा हवाईपट्टीचे विमानतळामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. खासगी कंपनी अनेक वर्षांपासून येथे विमान प्रशिक्षण घेत आहे. उमरी गावात विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. तर, रीवाचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, ट्रेनिंगदरम्यान विमान मंदिरावर कोसळले. 

Web Title: Madhya Pradesh, plane crash on temple in Rewa district, pilot died and trainee injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.