03 Dec, 23 11:39 PM
आज चार राज्यांचे निकाल लागले, जे जिंकले त्यांचे अभिनंदन; अगदी मोकळ्या मनाने करतो - उद्धव ठाकरे
आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 नंतरही होत राव्यात. हे जनतेने ठरवावे. पूर्वी एक म्हण होती यथा राजा तथा प्रजा, तशीच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण असावा. पण ते ठरवण्याचा अधिकार राहातो की जातो? असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत.
03 Dec, 23 08:48 PM
"जेथे इतरांकडून आशा संपते, तेथे मोदीची गॅरंटी सुरू होते"; पंतप्रधान मोदींचा जनतेला विश्वास
मोदीच्या गॅरंटीची गाडी, देशाच्या यशस्वीतेची गॅरंटी बनेल, ही देखील मोदीची गॅरंटी आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. "जिथे इतरांकडून आशा संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते."
03 Dec, 23 08:31 PM
मी आज प्रामुख्याने महिलांचे आभार मानेल - PM मोदी
"या चार जातींनी भाजपच्या योजना आणि भाजपच्या रोडमॅपबद्दल खूप उत्साह दाखवला. या विजयात प्रत्येक महिला, गरीब, शेतकरी, तरुण, आपला विजय पाहत आहे. प्रत्येकजण या विजयाला स्वतःचा विजय मानतोय. हा प्रत्येक मतदार भारताला 2047 मध्ये विकसित देश म्हणून पाहतोय. मी आज प्रामुख्याने महिलांचे आभार मानेल. भाजपला विजयी करण्याचे महिलांनी मनावर घेतले. महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान फक्त भाजपच करेल, हे प्रत्येक महिलेला माहितीये."
03 Dec, 23 08:23 PM
ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केले, ते सरकार आज सत्तेतून बाहेर पडले - पंतप्रधान मोदी
"देशातील तरुणांना भ्रष्टाचाराची मोठी चीड आहे. ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केले, ते सरकार आज सत्तेतून बाहेर पडले आहे. हे सरकार पेपर लीक आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपात अडकले आहे. याचाच परिणाम या तिन्ही राज्यात सत्ताधारी बाहेर गेले. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढतोय, भाजप त्यांच्या इच्छा जाणतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, हे देशातील तरुणांना माहिती आहे. भाजपचे सरकार तरुणांच्या हिताचे काम करते, नवीन संधी निर्माण करत आहे."
03 Dec, 23 07:52 PM
भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दर्शवल्याबद्दल, मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो - पंतप्रधान मोदी
'जनतेला प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.
03 Dec, 23 07:47 PM
भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दर्शवल्याबद्दल, मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो - पंतप्रधान मोदी
'जनतेला प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.
03 Dec, 23 07:45 PM
इंडिया अलायन्सने जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण PM मोदींचा विकासाचा मुद्दा भारी ठरला - जेपी नड्डा
मित्रांनो, या निवडणुकीतून आणखी एक संदेश मिळतो, इंडिया अलायन्सने ज्या पद्धतीने जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने समाज खंडित करण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि तुष्टिकरणाचे राजकारण पुढे नेण्याचे काम केले. यावर मोदीजींच्या विकासाचा मुद्दा भारी ठरला आहे. हेही आपण लक्षात ठेवायला हवे. देशाने विकासाला समोर ठेवून या निवडणूक निकालांवर मोहर उमटवली आहे.
03 Dec, 23 07:03 PM
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील बंपर विजयानंतर, PM नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील बंपर विजयानंतर, PM नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी "गॅरंटी है भाई गॅरंटी है, मोदी जी की गॅरंटी है." अशा घोषणाही देण्यात आल्या.
03 Dec, 23 06:57 PM
ही निवडणूक लोकसभेची रिहर्सल होती, लोकांना पंतप्रधान मोदींवर विश्वास - रामदास आठवले
03 Dec, 23 06:53 PM
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला...
03 Dec, 23 06:35 PM
तेलंगणातील जनतेचे आभार मानले - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जनतेचेही आभार मानले. 'तेलंगणातील माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी खूप आभार. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक करतो.'
03 Dec, 23 05:57 PM
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो - राहुल गांधी
"मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरुच राहणार. मी तेलंगणातील जनतेचा आभारी"
03 Dec, 23 05:19 PM
जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदीच - अमित शाह
03 Dec, 23 05:14 PM
भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दर्शवल्याबद्दल, मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो - पंतप्रधान मोदी
'जनतेला प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.
03 Dec, 23 03:48 PM
हा आमच्यासाठी फार मोठा धक्का - रेणुका चौधरी
हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. कुणाला तरी याची जबाबदारी घ्यावीच लागेल. तीन राज्यांमध्ये पराभव का झाला यावर आम्हाला आत्मपरिक्षणही करावं लागेल. तसेच तत्काळ मैदानात उतरून काम सुरू करावं लागेल. ही एक निवडणूक आहे, ठीक आहे. पुढील पाच महिन्यात लोकसभा निवडणूकही आहे. अनेकदा मतदार राज्यात वेगळ्या पद्धतीने मतं देतात आणि केंद्रात वेगळ्या पद्धतीने मतदान देतात. आता आमच्याकडे हातावर हात चोळत बसण्याला वेळ नाही. आम्ही लढू आणि पुढे जाऊ, असे काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या.
03 Dec, 23 03:46 PM
अशोक गेहलोत आज संध्याकाळीच राजीनामा देणार
राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज संध्याकाळीच राज भवनावर जाणार असून आपला राजीनामा देणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
03 Dec, 23 03:27 PM
भाजपचा हा शानदार विजय - वसुंधरा राजे
03 Dec, 23 02:38 PM
वसुंधरा राजे तब्बल 103010 मतांनी विजयी
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे तब्बल 103010 मतांनी विजयी झाल्या आहेत.
03 Dec, 23 02:27 PM
निवडणूक आयोगाकडून पहिली अधिकृत आकडेवारी जाहीर!
03 Dec, 23 01:49 PM
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण?
मध्य प्रदेशमधील विजयाचे श्रेय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय चौहान यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपाच्या सर्व नेत्यांना जाते. या विजयाचं सर्वाधिक श्रेय मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींना, माझ्या आत्यांना जाते. निकालाचे चित्र जसजसे स्पष्ट होईल, तसे दिसेल भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. शिवराज सिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेईल, असेही कार्तिकेय चौहान म्हणाले.
03 Dec, 23 01:42 PM
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला?
राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत असताना आता भाजपमधून मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे वसुंधरा राजेंचे भाजपा केंद्रीय नेतृत्वाबरोबर ताणले गेलेले संबंध असताना दुसरीकडे महंत बलकनाथ यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. मात्र, त्याचबरोबर भाजपामधील एक गट गजेंद्र शेखावत यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
03 Dec, 23 12:54 PM
केंद्रीय मंत्री नरेद्र सिंह तोमर पिछाडीवर
मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुक लढविणारे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे पिछाडीवर आहेत. दिमानी विधानसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर निवडणूक लढवीत आहेत. या जागेवर सर्वांचे लक्ष लागले होते. दिमानी ही जागा काँग्रेसची पारंपारिक जागा मानली जाते.
03 Dec, 23 12:38 PM
मोदींबद्दल जनमानसात विश्वास - अश्विनी वैष्णव
मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा खूप चांगला विजय झाला आहे. राज्यात भाजपा सरकारने चांगलं काम केलं आहे. डबल इंजिन सरकारबद्दल, मोदींबद्दल जनमानसात विश्वास आहे. तसेच शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या कामाचा परिणाम आज निकालात दिसला आहे. मध्य प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन,असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
03 Dec, 23 12:35 PM
राजस्थानमध्ये सातही खासदार पिछाडीवर, भाजपला धक्का
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने सात विद्यमान खासदार निवडणुक लढवीत होते. मात्र, हे सातही खासदार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. हा भाजपला धक्का मानला जात आहे.
03 Dec, 23 12:12 PM
जयपूर भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन
जयपूर भाजपा कार्यालयाबाहेर महिला कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनला सुरुवात
03 Dec, 23 11:54 AM
मोदींच्या मनातही मध्य प्रदेश - शिवराज सिंह चौहान
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झालं. या कामानेही जनतेची मनं जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला. नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या जनतेच्या मनात आहेत. मोदींच्या मनातही मध्य प्रदेश आहे. त्यांनी मध्य प्रदेशात ज्या सभा घेतल्या, जनतेला आवाहन केलं ते जनतेच्या मनाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच हा निवडणूक निकालाचा कल समोर येत आहे. हेच या निकालाचं प्रमुख कारण आहे, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.
03 Dec, 23 11:29 AM
भाजपा मोठ्या बहुमताने जिंकेल - गजेंद्र सिंह शेखावत
भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या, असे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले.
03 Dec, 23 11:17 AM
मतमोजणीला तीन तास पूर्ण, आतापर्यंतच्या कलांमधून राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं बहुमत निश्चित
मतमोजणीला तीन तास पूर्ण, आतापर्यंतच्या कलांनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा १६० जागांवर तर काँग्रेस ६८ जागांवर आघाडीवर, राजस्थानमध्ये भाजपा ११० तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर
03 Dec, 23 11:08 AM
मध्य प्रदेशच्या मनात मोदी, तर मोदींच्या मनात मध्य प्रदेश, विजय निश्चित होताच शिवराज सिंह चौहान यांचं मोठं विधान
03 Dec, 23 11:01 AM
कलांमध्ये बहुमताच आकडा पार करताच राजस्थानमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात
03 Dec, 23 10:40 AM
मध्य प्रदेशात भाजपाला दीडशेपार, तर राजस्थानमध्येही गाठला बहुमताचा आकडा
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत आतापर्यंतच्या कलांमध्ये १५३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस केवळ ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होत असून, इथे भाजपा १०७ आणि काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे.
03 Dec, 23 10:34 AM
लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? तज्ज्ञांचं सखोल विश्लेषण
03 Dec, 23 10:23 AM
निवडणूक आयोगाच्या कलांनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा १३३, तर काँग्रेस ५८ जागांवर आघाडीवर, इतर ३ जागांवर आघाडीवर
03 Dec, 23 09:52 AM
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा बहुमताच्या दिशेने, काँग्रेस पिछाडीवर
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने १३५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस केवळ ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होत असून, इथे भाजपा ८२ आणि काँग्रेस ७४ जागांवर आघाडीवर आहे.
03 Dec, 23 09:28 AM
मध्य प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर राजस्थानमध्ये चुरशीची लढत
आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस ६२ आणि भाजपाने ५२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्ष ८ जागांवर आघाडीवर आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ९६ आणि काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर आहे.
03 Dec, 23 09:16 AM
निवडणूक आयोगाच्या कलांनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस ८ तर भाजपा ६ जागांवर आघाडीवर, ३ जागांवर इतर आघाडीवर
03 Dec, 23 09:07 AM
मतमोजणीचा एक तास पूर्ण, दोन्ही राज्यांमध्ये भाजपाने घेतली आघाडी
आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस ४३ आणि भाजपाने ४४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ४८ आणि काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे.
03 Dec, 23 08:59 AM
काँग्रेस नेते कमलनाथ पक्षाच्या मुख्यालयात दाखल, निकालांबाबत केलं मोठं विधान
03 Dec, 23 08:46 AM
सुरुवातीच्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस, तर मध्य प्रदेशमध्ये भाजपा आघाडीवर
आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस २७ आणि भाजपाने २२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ३५ आणि काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर आहे.
03 Dec, 23 08:34 AM
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेश मध्ये आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये काँग्रेस १५ तर भाजपा १२ जागांवर आघाडीवर, तर राजस्थानमध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस १५ आणि भाजपा १० जागावर आघाडीवर
03 Dec, 23 08:21 AM
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत
03 Dec, 23 08:17 AM
काँग्रेस राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता राखणार, तर मध्य प्रदेश आणि तेलंगाणामध्ये जिंकणार - पवन खेरा, काँग्रेस नेते
03 Dec, 23 08:08 AM
भाजपा नेते केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जयपूरमधील गोविंददेव मंदिरात पूजा करून घेतले आशीर्वाद
03 Dec, 23 08:04 AM
मतमोजणीपूर्वी काँग्रेसमध्ये उत्साह, मुख्यालयात ढोल-नगाऱ्यांसह जल्लोष
मतमोजणीपूर्वी काँग्रेसमध्ये उत्साह, मुख्यालयात ढोल-नगाऱ्यांसह जल्लोष
03 Dec, 23 08:01 AM
राजस्थानमध्ये टपाली मतांच्या मतमोजणीला सुरुवात
राजस्थानमध्ये टपाली मतांच्या मतमोजणीला सुरुवात. राज्यातील एकूण १९९ मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात
03 Dec, 23 07:53 AM