मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसला अनुकूल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 03:52 AM2018-08-11T03:52:59+5:302018-08-11T03:53:10+5:30

राजस्थान व मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांत काँग्रेस विजयी होऊ शकते, असे एका गोपनीय सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

Madhya Pradesh, Rajasthan Congress favorable? | मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसला अनुकूल?

मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसला अनुकूल?

Next

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राजस्थान व मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांत काँग्रेस विजयी होऊ शकते, असे एका गोपनीय सर्वेक्षणातून आढळून आले आहे. अर्थात हे सर्वेक्षण काँग्रेसनेच केले असले तरी ज्या संस्थेकडून ते करण्यात आले होते, तिला ते कोणासाठी करीत आहोत, याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यात राजकीय अभिनिवेश नसल्याचे कळते. या दोन राज्यांत विजय मिळणे काँग्रेससाठी महत्त्वाचेच आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.
या सर्वेक्षणानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस व सत्ताधारी भाजपा यांच्यात कमालीची चुरस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथेही राहुल गांधी अधिक जोर लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच राहुल गांधी शुक्रवारी छत्तीसगडला रवाना झाले असून, त्यानंतर ते राजस्थान व मध्य प्रदेशात जाणार आहेत.
>मंदिरे व दर्ग्यांना भेटी देणार
गुजरातप्रमाणेच ते राजस्थान व मध्य प्रदेशात मंदिर व दर्ग्यांना भेटी देणार आहेत. छत्तीसगडला रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणूक समितीची घोषणा केली. त्यात कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, सत्यव्रत चतुर्वेदी, अरुण यादव, मीनाक्षी नटराजन, कांतिलाल भुरिया यांच्यासह राज्यातील २४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Madhya Pradesh, Rajasthan Congress favorable?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.