मरणानंतरही मरणयातना सुरुच, शववाहिनी नाकारल्यानं आईचा मृतदेह त्यानं बाईकवरुन नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 10:23 AM2018-07-11T10:23:56+5:302018-07-11T10:25:23+5:30
माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना
भोपाळ : मध्यप्रदेशच्या टीकमगडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाला जन्मदात्या आईचा मृतदेह हा वेळेत शववाहिनी न मिळाल्यामुळे बाईकवर बांधून शवविच्छेदनासाठी घेऊन जावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
साप चावल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. तसेच शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह नेण्याचा सल्ला दिला.
#WATCH Tikamgarh: Man brought dead body of mother on a motorcycle for post mortem after being allegedly denied hearse van by district hospital in Mohangarh. Upper Collector has ordered an inquiry. (7.7.18) #MadhyaPradeshpic.twitter.com/zyrjasFTVe
— ANI (@ANI) July 11, 2018
मृत महिलेच्या मुलाने मृतदेह नेण्यासाठी सरकारी शववाहिनी मिळावी म्हणून अनेकदा फोन केले. मात्र कोणतेही कारण न देता शववाहिनी देण्यास नकार देण्यात आला. शेवटी वाहन न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह हा बाईकला बांधून शवविच्छेदनासाठी नेला. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.