Video : जेवण करत होता टोल प्‍लाझा कर्मचारी, अचानक बेंचवरून कोसळला अन् क्षणात सर्व काही संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 01:39 PM2023-02-19T13:39:40+5:302023-02-19T13:40:25+5:30

त्यांनी जेवण घेण्यासाठी आपला टीफीन उघडला. बेंचवर बसून त्यांनी जेवण सुरूच केले होते. तेवढ्यात...

Madhya pradesh Toll Plaza employee dies while eating suddenly fell from the bench and everything ended in a moment watch live video | Video : जेवण करत होता टोल प्‍लाझा कर्मचारी, अचानक बेंचवरून कोसळला अन् क्षणात सर्व काही संपलं

Video : जेवण करत होता टोल प्‍लाझा कर्मचारी, अचानक बेंचवरून कोसळला अन् क्षणात सर्व काही संपलं

googlenewsNext

सागर - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा जेवता जेवताच मृत्यू झाला. ड्यूटीवर तैनात असलेला हा गार्ड जेवण करत असतानाच अचानकपणे बेन्चवरून खाली कोसळला. यानंतर या कर्मचाऱ्याचा तेथेच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संबंधित कर्मचाऱ्याचे नाव उदल यादव असल्याचे समजते. 52 वर्षीय यादव हे राष्ट्रीय महामार्ग 44 च्या मालथौन टोल नाक्यावर कार्यरत होते. ते मालथौन येथीलच रहिवासी होते. त्यांनी जेवण घेण्यासाठी आपला टीफीन उघडला. बेंचवर बसून त्यांनी जेवण सुरूच केले होते. तेवढ्याच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर ते अचानकपणे बेन्चवरून खाली कोसळले आणि क्षणात त्यांचा प्राण गेला. हे सर्व केवळ काही सेकंदांतच घडले. 


टोल नाक्यावरील इतर कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळताच ते त्यांच्याजवळ पोहोचले. मात्र, उदल बेन्चच्या खाली शांतपणे पडलेले होते. यानंतर उदल यांना घाई गडबडीत रुग्णालयात नेण्यात आले. येथेच डाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी हाती घेतले आहे. प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: Madhya pradesh Toll Plaza employee dies while eating suddenly fell from the bench and everything ended in a moment watch live video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.