आपण पाहतो की, महिला आणि पुरुष दोघेही मेकअप करण्यासाठी ब्युटी सलूनमध्ये जात असतात आणि त्यांचा आवडता मेकअप करत असतात. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने ती संतापली. तिला एवढा राग आला की, तिने आत्महत्याच केली.
ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील रहिवासी बलराम यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. बलराम आणि त्यांची पत्नी रीना यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. बलराम टेलरिंग काम करतात. त्यांच्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जायचे होते. मात्र, काही कारणास्तव, त्यानी तिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिला होता. यामुळे त्याची पत्नी संतापली आणि तिने रागाच्या भरात गळफास घेतला.
बलराम यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याच्यासोबत भांडत होती. मात्र बलराम यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम आणि त्याची पत्नी रीना या दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत होते. गुरुवारी त्याने पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने रीना संतापाच्या भारत खोलीत गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला.
बराच वेळ दरवाजा न उघडल्याने बलराम यांनी आत डोकावून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्यांना पत्नी फासावर लटकलेली दिसली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून तिला खाली उतरवले. तोवर सर्वकाही संपले होते. तपास अधिकाऱ्यानी म्हटले आहे, पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बलराम यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा तपास सुरू आहे.