मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:44 PM2018-12-22T18:44:19+5:302018-12-22T18:47:18+5:30
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या 5 राज्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जिंकलेल्या मध्य प्रदेशमध्ये मंत्रिमंडळावर कोणाची वर्णी लागणार याचा तिढा शनिवारी संध्याकाळपर्यंत सुटला नव्हता. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकला असून नावे निश्चित न झाल्याने ते पुन्हा आज सायंकाळी राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार आहेत.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावर शुक्रवारी दुपारी दोन तास राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. या कारणावरूनच सिंधिया यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही. मध्य प्रदेशमध्ये येत्या 25 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.
Swearing-in ceremony of the Madhya Pradesh cabinet ministers to be held on 25th December at Raj Bhavan in Bhopal.
— ANI (@ANI) December 22, 2018
दरम्यान, आज कर्नाटकमध्येकाँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिलेल्या कुमारस्वामी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला. राज्यपाल विजुभाई वाला यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली.
Karnataka Governor Vajubhai Vala administers oath to new State cabinet ministers at Raj Bhavan in Bengaluru. #Karnatakapic.twitter.com/zlFhh9cE36
— ANI (@ANI) December 22, 2018