Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेशची मामाजींनाच साथ, काँग्रेस दारुण पराभवाच्या मार्गावर? असे आहेत सुरुवातीचे आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:11 AM2023-12-03T10:11:51+5:302023-12-03T10:28:18+5:30
Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या आकडेवारीमध्ये मध्य प्रदेशमधील जनता मुख्यमंत्री मामाजी अर्थात शिवराज सिंह चौहान यांनाच कौल देताना दिसत आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस केवळ ७० जागांवर आघाडीवर आहे. तर सपा, बसपा प्रत्येकी एक आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत.
२३० जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेसाठी चुरशीने मदतान झाले होते. तसेच यावेळी सत्ताधारी भाजपाला सत्ता राखणे काहीसे अवघड होईल, असा दावा केला जात होता. तसेच काही एक्झिट पोलमधून भाजपाच्या पराभवाचेही दावे केले जात होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी १४० जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत घेण्याच्या दृष्टीने आगेकूच केली आहे. तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
दुसरीकडे राजस्थानमध्येही भाजपा काँग्रेसला धक्का देताना दिसत आहे. राजस्थानमध्ये भाजपाने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ७७ जागांवर आघाडीवर आहे. राजसस्थानमध्ये बहुमताचा आकडा १०१ आहे. इथे बसपा २ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.