बुधवारी CBSE 10व्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. त्यात मुलांचे गुण पाहून अनेकांचे डोळे विस्फारतील. पण, या सर्वांत एका मुलाची मार्कशीट सध्या व्हायरल झाली आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या रखीआज मुल्लाहनं माध्यमिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून सर्वांना थक्क केलं आहे.
लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा!
कोलकाता येथील एका गरीब कुटुंबातील रखीआजचा जन्म... कुटुंबाचे मासिक उत्पन्न दीड हजार, तर कधी 900 रुपये. पण, कोरोना संकटामुळे आबाह आणि उमपून यांच्यासमोरील संकट वाढले. त्यांना आपल्या मुलाला एकवेळचं जेवणही देता आले नाही. अशा कुटुंबात जन्मलेल्या रखीआजनं परिस्थितीकडे बोट न दाखवता मेहनत घेतली आणि माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली.
रखीआजचे वडील कामगार आहेत आणि आई शिवणकाम करते. दोघांच्या कामातून येणारे उत्पन्न जणू नाहीच. पाचव्या इयत्तेपासून रखीआज आईला शिवणकामात मदत करायचा. त्यामुळे त्यांना दोन वेळचं जेवण जेवता येत होतं. मथुरापूर येथील कृष्णचंद्रपूर हायस्कूलमध्ये रखीआज शिकतो. त्यानं बंगाली भाषेत 98, गणितात 99 आणि भूगोलात 100पैकी 100 गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानं एकूण 91 टक्के मिळवले. त्याला 100 टक्के मिळवण्यासाठी केवळ 19 मार्क्स कमी पडले.
त्याच्या या यशानं कृष्णचंद्रपूर हायस्कूलच्या शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रायव्हेट ट्यूशन सोडा, रखीआज नियमित शाळेतही जात नव्हता. त्याला कुटुंबीयांना मदत करणे भाग होते. त्याला शाळेतील शिक्षकांनी मदत केली. शाळेचे मुख्याध्यापक चंदन मैती यांनी त्याला शिक्षणात मदत केली. केवळ शिक्षणासाठी नाही चंदन मैती यांनी संकट काळात रखीआजला आर्थिक सहकार्यही केलं.
दक्षिण आफ्रिकेत 18 जुलैला होणार आगळावेगळा सामना; पण सहा जणांना कोरोनाची बाधा!
त्याचं घर वाहून गेलं होतं आणि घरात खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तेव्हा मैती यांनी या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली. पण, रखीआजचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. अजून त्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. रखीआजला वैद्यकिय शिक्षण घ्यायचे आहे. पण, त्यासाठी त्याला आर्थिक मदत करणार कोण? रखीआजचे कुटुंबीय आता चमत्काराची आस लावून बसले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल
25 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची कोरोनावर मात; पत्नी अजूनही पॉझिटिव्ह
कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल
ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार