Domestic Violence Act: “पुरुषांसाठी घरगुती हिंसाचारासारखा कायदा नाही, हे दुर्दैव”: मद्रास हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:14 PM2021-06-01T18:14:25+5:302021-06-01T18:16:32+5:30
Domestic Violence Act: पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचाराच्या कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, हे दुर्दैव असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
चेन्नई: देशात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे. यासाठी घरगुती हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात असून, या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले जाते. मात्र, मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीवेळी पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचाराच्या कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, हे दुर्दैव असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. (madras high court says there is no law like domestic violence act for husband to proceed against wife)
एका महिलेने तिच्या पतीला त्रास देण्यासाठी घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती. त्यावर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने पुरुषांसंदर्भात भाष्य केले आहे. न्या. एस. वैद्यनाथन यांनी याचिकेवरील सुनावणीवेळी काही निरीक्षणे नोंदवली. घरगुती हिंसाचाराच्या महिलांविरुद्धच्या प्रकरणामंध्ये पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचार कायद्यासारखा कायदा नाही, असे मत न्या. वैद्यनाथन यांनी व्यक्त केले.
“...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला
याचिकाकर्त्यास अनावश्यक त्रास दिला आहे
याचिकाकर्त्याची पत्नी याचिकाकर्त्यास अनावश्यकपणे त्रास देत आहे. पतीकडून घरगुती हिंसाचार कायद्यासारखी पत्नीविरूद्ध कारवाई करण्याची मागणी नाही. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी चार दिवस आधीच तक्रार दिली आहे. यावरुन स्पष्ट होते की, पत्नीने घटस्फोटाची अपेक्षा केली आहे आणि याचिकाकर्त्यास अनावश्यक त्रास दिला आहे, असे या प्रकरणात दिसून येते, असे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक
लग्न हा करार नसून एक संस्कार
सध्याच्या पिढीने हे समजून घेतले पाहिजे की लग्न हा करार नसून एक संस्कार आहे. घरगुती हिंसाचार अधिनियम २००५ लागू झाल्यानंतर ‘संस्कार’ या शब्दाला अर्थ उरला नाही. अहंकार आणि असहिष्णुता या गोष्टी घरात येताना बाहेर ठेवल्या पाहिजे. अन्यथा मुलांना दयनीय आयुष्याला सामोरे जावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी? हमासकडून हजारो रॉकेटची निर्मिती सुरू
दरम्यान, या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराती तक्रार दाखल केल्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. न्या. वैद्यनाथन यांनी याचिकाकर्त्याला १५ दिवसांच्या आत पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याने पत्नीच्या छळाला कंटाळून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाने ती मान्य केली होती. निकाल येण्यापूर्वीच पत्नीने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली.