प्रयागराज (उत्तर प्रदेश) : प्रयागराजमधील विशेष न्यायालयाने मंगळवारी माफियाचा राजकारणी झालेले माजी खासदार अतीक अहमद याच्यासह तीन आरोपींना राजू पाल खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या सुमारे १७ वर्षांपूर्वीच्या अपहरणप्रकरणी दोषी ठरवले. तिन्ही आरोपींना सश्रम जन्मठेपेची व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकारी वकील गुलाब चंद्र अग्रहरी यांनी सांगितले की, प्रयागराज न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश चंद्र शुक्ला यांनी २००६ मध्ये या प्रकरणात अतीक अहमद, त्याचे वकील सौलत हनीफ आणि माजी नगरसेवक दिनेश पासी या तीन आरोपींना दोषी ठरवून भादंविच्या कलम ३६४-अ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आवारात उपस्थित वकिलांनी दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत घोषणाबाजी केली. अहमदचा भाऊ अश्रफसह सात आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.