शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

‘महा’ चक्रीवादळ उद्या गुजरात किनारी धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 6:42 AM

पावसाचा अंदाज : ठाणे, पालघरमध्ये कोसळधार; मुंबईत गडगडाटासह सरींची शक्यता

मुंबई : अरबी समुद्रावरील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळ ७ नोव्हेंबरच्या पहाटे ते दिव व पोरबंदरदरम्यान धडकेल, अशी शक्यता असून, बुधवारी मुंबई व परिसरात मेघगर्जनेसह किरकोळ पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, तसेच पालघर व ठाणे जिल्ह्यात मुसळधार सरी कोसळतील. गुरुवारी मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मुसळधार कोसळेल.

या चक्रीवादळामुळे बुधवार व गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात सोसाट्याचा वारा वाहील. उत्तर कोकणातील तसेच गुजरातमधील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका गुजरातच्या किनारी भागांतच बसणार आहे. जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बोटाड, पोरबंदर आणि राजकोट येथे बुधवारी अति मुसळधार तर गुरुवारी भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बोटाड, वडोदरा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला आहे.गावांमध्ये जनजागृती, मदतीसाठी नौदल सज्ज‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेतली, तसेच डहाणू, तलासरी तालुक्यातील किनारपट्टीजवळील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. मदतकार्याकरिता भारतीय नौदलानेही चार जहाजे सज्ज ठेवली आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसcycloneचक्रीवादळGujaratगुजरात