Maha Kumbh 2025 News: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात दररोज कोट्यवधी भाविक येत आहेत. महाकुंभाचा हा शेवटचा आठवडा असून, येत्या महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभात स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने वैद्यकीय सुविधा आणखी मजबूत केल्या आहेत.
महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. महाशिवरात्रीला स्नानासाठी येणारी मोठी गर्दी पाहता प्रशासनाने आरोग्य सेवा अधिक बळकट केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू (SRN) रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील आयसीयू खाटांची संख्या 147 करण्यात आली आहे. शिवाय, ट्रॉमा केअर आणि व्हेंटिलेटर सुविधा 24x7 उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
आयसीयू सुविधा पुढीलप्रमाणे असतील:-
• हृदयरोग विभाग - 23 खाटा• सर्जिकल ICU - 10 बेड• बालरोग ICU - 10 बेड• नवजात ICU - 15 बेड• स्त्रीरोग आणि प्रसूती ICU - 8 बेड• ट्रॉमा ICU - 10 बेड• औषधी ICU - 20 बेड• न्यूरोसर्जरी ICU - 10 बेड• गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ICU – 6 बेड• श्वसन आयसीयू - 6 बेड• न्यूरोलॉजी ICU - 10 बेड• अतिरिक्त ICU बेड - 19 बेड (आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी)
24 तास आपत्कालीन सेवामहाकुंभ काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. व्हेंटिलेटर, देखरेख यंत्रणा आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके 24 तास तैनात करण्यात आली आहेत.
भाविकांच्या सुरक्षा सरकारचे प्राधान्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाविकांची सुरक्षा आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. महाशिवरात्रीला होणाऱ्या गर्दीच्या वेळी कोणालाही वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सरकारने केलेल्या या प्रयत्नांमुळे भाविकांना महाकुंभाचा सुरक्षित आणि आरोग्यदायी अनुभव मिळणार आहे. यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी महाकुंभातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.