शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ -पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 05:53 IST

प्रयागराज येथे उभारणार ५५०० कोटींचे विकास प्रकल्प 

- राजेंद्रकुमार लोकमत न्यूज नेटवर्कप्रयागराज : महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ असून त्यामुळे देशाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सांगितले. विविध विकास प्रकल्पांच्या मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी एका जाहीर सभेमध्ये ते म्हणाले की, जातीपाती, पंथ हे सगळे भेद महाकुंभमेळ्यामध्ये विसरले जातात.

प्रयागराज येथे पुढील वर्षी महाकुंभ मेळा भरणार असून त्यासाठी १६७ महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे मोदी यांनी शुक्रवारी भूमिपूजन केले. या प्रकल्पांसाठी ५५०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. तिथे झालेल्या जाहीर सभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्यासाठी कलशाची स्थापना केली. तसेच गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली व कलश स्थापित केला.

महाकुंभ मेळ्याच्या आयाेजनामुळे देशात सकारात्मकतेचा प्रसार : पंतप्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाकुंभ मेळ्यासारख्या गोष्टींच्या आयोजनामुळे देशात सकारात्मकतेचा प्रसार होतो. याआधीच्या सरकारांनी महाकुंभ मेळा अधिक उत्तम पद्धतीने व्हावा यासाठी कोणत्याही खास उपाययोजना केल्या नाहीत. मात्र, या मेळ्याचे धार्मिक व ऐतिहासिक रूप लक्षात घेता त्याचे आयोजन अधिक नेटक्या पद्धतीने व्हावे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. सुमारे ४५ दिवस चालणाऱ्या या मेळ्यामध्ये दररोज येणाऱ्या लाखो भाविकांसाठी योग्य त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

डिजिटल सुविधा देऊ : योगी आदित्यनाथउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, २०१९ साली उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले होते. २०२५ साली होणारा मेळा हा भव्य होणार असून त्यात अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 

विकास कामांची पाहणीnहा महाकुंभ मेळा जिथे भरणार आहे त्या परिसरात हनुमान व अक्षयवट कॉरिडॉरचा विकास करण्यात येत असून त्या कामाच्या प्रगतीची त्यांनी पाहणी केली.  nमोदी यांनी जाहीर सभेत सांगितले की, काही हजार वर्षांपासून महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा मेळा म्हणजे कला, संस्कृतीचा अनोखा संगम आहे. साऱ्या विश्वात प्रयागराजला विशेष स्थान आहे. यंदाचा महाकुंभ मेळा जगभरात गाजणार आहे, असाही दावा माेदी यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी