- एस. पी. सिन्हा, पाटणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात एकमेकांची प्रशंसा करण्याच्या चढाओढीचा त्रास राज्यातील महाआघाडीला होताना दिसतो आहे.शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी नितीश यांची प्रशंसा केली. त्याची चर्चा गल्लीबोळात सुरू झाली आहे. याशिवाय गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या प्रकाशपर्व कार्यक्रमात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना व्यासपीठावर स्थान न दिले गेल्याचा मुद्दाही तापत आहे.निर्माण झालेल्या वादाची झळ महाआघाडीलाही लागताना दिसते आहे. राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांनी मोदी आणि नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे. रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, ‘बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आहे, त्यामुळे यादव यांना व्यासपीठावर स्थान मिळायला पाहिजे होते.’