नवी दिल्ली : डाव्यांच्या नकारामुळे बिहारमध्ये भाजपविरुद्ध महाधर्मनिरपेक्ष आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. काँग्रेसच्या ध्येयधोरणांना असलेला विरोध पाहता डाव्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.डाव्यांना या आघाडीत सहभागाचे निमंत्रण देण्यात आल्यानंतर कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये डाव्या आघाडीतील भाकप आणि माकप या दोन प्रमुख पक्षांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव ओसरला आहे. एकेकाळी मुख्य विरोधी पक्ष राहिलेल्या भाकपचे अस्तित्व काही नक्षलग्रस्त भागापुरते सीमित झाले आहे. भाकप (एम-एल) या पक्षाला मध्य बिहार आणि काही नक्षलग्रस्त भागांमध्ये चांगले समर्थन लाभले आहे. आमचा पक्ष डाव्या आघाडीत असला तरी जेडीयू-राजद-काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होणार नाही, असे भाकप (एम-एल) प्रभात चौधरी यांनी सांगितले.