उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. तसेच या कुंभमेळ्यामध्ये दररोज लाखो भाविक उपस्थितीत राहून त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्या भाविकांचा आकडा नियमितपणे जाहीर करत आहेत. या आकडेवारीनुसार पौष पौर्णिमेदिवशी दीड कोटी लोकांना पवित्र स्नान केलं होतं. अमृत स्नानावेळी अडीच कोटी लोकांना स्नान केलं होतं, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे योगी सरकार ही आकडेवारी कोणत्या आधारावर जाहीर करत आहे, हे आपण आता जाणून घेऊयात.
मोठ्या गर्दीच्या ठिकाणी उपस्थित लोकांची मोजणी करण्याच्या विविध पद्धती आहेत. दरम्यान, योगी सरकार गर्दीच्या ठिकाणी मोजणीसाठी ज्या तंत्राचा वापर करत आहे त्यात एआय बेस्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे. हे कॅमेरे गर्दीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या संख्येचा अंजाज बांधतात. संपूर्ण महाकुंभमेळ्याच्या परिसरात सुमारे १८०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामधील ११०० कॅमेरे हे कायम स्वरूपी आहेत. तर ७०० कॅमेरे हे तात्पुरते लावण्यात आले आहेत. यामधील बहुतांश कॅमेरे हे एआय बेस्ड आहेत.
प्रयागराज येथील ४८ घाटांवर स्नान करणाऱ्या लोकांचं क्राउड असेसमेंट एक विशेष टीम करत आहे. त्यासाठी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी अनेकदा क्राऊड कॅल्क्युलेशन रिहर्सल करण्यात आली होती. महाकुंभमेळ्यामधील ४८ घाटांवर क्राऊड कॅपॅसिटी असेसमेंट रियल टाइम बेसिसवर केलं जात आहे. त्यासाठी एक टीम दर तासाला क्राऊड काऊंटिंग असेसमेंट करत आहे.
तसेच तज्ज्ञांची एक टीम ४८ घाटांवर दर तासाला क्राऊड असेसमेंट करत आहे. त्याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून गर्दींचं एका निश्चित चौकटीमधील घनत्व मोजलं जात आहे. त्यानंतर ते क्राऊड असेसमेंट टिमला पाठवलं जात आहे. त्याशिवाय एका विशिष्ट्य अॅपच्या माध्यमातून मोबाईलच्या सरासरी संख्येच्या आधारावर महाकुंभमेळ्यामधील लोकांच्या सरासरी संख्येचा अंदाज बांधला जात आहे.