शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 14:40 IST

उमेश  यांना या रुग्णालयात Covaxin एवजी Covishield चा डोस देण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच ते भयभीत झाले. यानंतर त्यांनी इतर लोकांना संबंधित घटनेची माहिती दिली. मग...

महराजगंज : उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या जबाबदार कर्मचाऱ्यांत मोठा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. येथे सीडीओच्या वाहन चालकाला आधी कोरोनाची Covaxin लस देण्यात आलील तर दुसऱ्यांदा Covishield चा डोस देण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात येताच पीडित व्यक्तीसह इतर लोक नाराजी व्यक्त करत लसीकरण केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी येथे जबरदस्त धिंगाणा घातला. यानंतर. घटनेची माहिती मिळताच संबंधित आधिकारी घटना स्थळी पोहोचे. यानंतर प्रकरण शांत झाले. (UP Maharajganj man given covishield after covaxin)

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

25 फेब्रुवारीला देण्यात आला होता पहिला डोस -पीडित उमेश यांनी सांगितले, की ते सीडीओ गौरव सिंह सोगरवाल यांचे वाहनचालक आहेत. त्यांना 25 फेब्रुवारीला Covaxinचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यांना 25 मार्चला दुसरा डोस मिळणार होता. मात्र, याला काही कारणामुळे उशीर झाला. ते गेल्या मंगळवारी दुसरा डोस घेण्यासाठी डिल्हा रुग्णालयात (महिला) गेले होते.

अधिकाऱ्यांकडे केली तक्रार -  उमेश  यांना या रुग्णालयात Covaxin एवजी Covishield चा डोस देण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच ते भयभीत झाले. यानंतर त्यांनी इतर लोकांना संबंधित घटनेची माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासंदर्भात बोलताना मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. एके श्रीवास्तव म्हणाले, लशीचा कसल्याही प्रकारचा साइड इफेक्ट नाही. यावर आरोग्य कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरणही घेण्यात आले आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

उत्तर प्रदेशात सातत्याने वाढतोय रुग्णांचा आकडा -उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. येथे गेल्या 24 तासांत 20,510 नवे रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1,11,835 वर पोहोचली आहे. 4,517 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9,376 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 2,10,121 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल