शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 6:00 PM

Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या हरयाणार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हरयाणामध्ये बसलेल्या धक्क्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीसाठी सतर्क झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या हरयाणार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हरयाणामध्ये बसलेल्या धक्क्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीसाठी सतर्क झाले आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीत चांगल्या स्थितीत असतानाही काँग्रेसला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर  मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांनी केला होता. त्यामधून धडा घेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे अधिकाधिक जागांची मागणी करत आहे. मात्र जागावाटपावरून आघाडीमध्ये फूट पडणार नाही एवढाच दबाव काँग्रेसकडून आणला जात आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सावधपणे पावलं टाकली जात आहेत.

याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राज्यपाळीवरील कुठल्याही नेत्याने मनमानी करता कामा नये, यासाठी राज्याच्या विविध भागांसाठी ११ वरिष्ठ पर्यवेक्षक आणि दोन वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे मुस्लिम आणि दलितांची एक भक्कम मतपेढी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेलचे १३ खासदार निवडून आले होते. तसेच सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

काँग्रेसच्या नेत्यांच्या मते  महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या काही वेगळ्या समस्या आहेत. हरयाणातील भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसकडे महाराष्ट्रात नाही. मात्र याचा एक फायदा म्हणजे पक्षाला आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, यावेळी जागावाटपामध्ये काँग्रेस पक्ष कुठल्याही दबावाखाली काम करणार नाही.  हरणायामध्ये असे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ज्यांची शिफारस राज्यातील बड्या नेत्यांनी केली होती. मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ विजय मिळवू शकतील, अशा नेत्यांना उमेदवारी देण्यावर टीम राहुलने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहेत  त्याबरोबरच उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी बंडखोरी करू नये यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरील नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी पाच गॅरंटीची घोषणा करण्यात येणार आहे. हरयाणामध्ये जाहीरनामा उशिरा जाहीर करण्यात आल्याचा फटका पक्षाला बसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाच गॅरंटीची घोषणा करण्याचा विचार काँग्रेसकडून गांभीर्याने सुरू आहे. यामध्ये रोख मदत, महिलांना मोफत बस प्रवास, १० किलो मोफत धान्य, स्वस्त वीज आणि बेरोजगारी भत्ता यांचा समावेश आहे. त्याबरोबरच जातनिहाय जनगणनेचं आश्वासन दिलं जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी