"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:00 PM2024-11-12T22:00:22+5:302024-11-12T22:00:44+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : ...आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात असेच कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे.

maharashtra assembly election 2024 if You not united Congress will snatch your reservation says PM Narendra Modi in Chimur Maharashtra | "फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!

"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!

लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी अर्थात 'INDIA' आघाडीतील पक्षांनी भाजपला टार्गेट करत, जर त्यांना 400 जागा मिळाल्या, तर ते संविधान बदलतील आणि वंचितांचे आरक्षण काढून घेतील, असे म्हटले होते. याचा मोठा परिणाम महाराष्ट्र आणि यूपीसारख्या राज्यांमध्ये झाल्याचे मानले जाते. येथे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना फार कमी जागा मिळाल्या होत्या. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात असेच कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे. 'जर आपण एकजूट (संघटित) राहिला नाहीत, तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल', असे नरेंद्र मोदी यांनी म्हटेल आहे. ते मंगळवारी महाराष्ट्रातील चिमूर येथील सभेला संबोधित करत होते.

"तुमची एकजूट तुटली, तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल" -
मोदी म्हणाले, "जर आपण एक राहिला नाही, तुमची एकजूट तुटली, तर सर्वातआधी काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून अथवा हिसकावून घेईल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. समृद्धी कायम राहावी यासाठी आपण एकसंध राहायला हवे. या देशातील 10 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. काँग्रेसला त्यांना जातींमध्ये विभाजित करायचे आहे, जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. जर आदिवासी समाजात फूट पडली, तर हे लोक त्यांची ओळखच नष्ट करतील. काँग्रेसचे युवराज परदेशात हे बोलले होते. काँग्रेसच्या कटकारस्थानापासून स्वतःला वाचूवायचे आहे आणि एकजूट राहायचे आहे.

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात आता प्रचारासाठी साधारणपणे एक आठवडाच उरला आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सक्रियताही वाढली आहे. याशिवाय, 'बटोगे तो कटोगे' आणि 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांचाही परिणाम होताना दिसत आहे.
 

Web Title: maharashtra assembly election 2024 if You not united Congress will snatch your reservation says PM Narendra Modi in Chimur Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.