"घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:17 PM2023-12-28T12:17:33+5:302023-12-28T12:18:28+5:30
काँग्रेसच्या या अभियानावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत पाच खोचक सवाल विचारले आहेत.
काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
काँग्रेसच्या या अभियानावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत पाच खोचक सवाल विचारले आहेत. महाराष्ट्र भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. तसेच पुन्हा हारण्यासाठी, मोहब्बत, करप्शनचं दुकान सुरू करण्यासाठी स्वागत आहे तुमचं असं देखील या पोस्टरवर म्हटलं आहे.
काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 28, 2023
१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे… pic.twitter.com/AXAIZQkG3l
"काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?
१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?" असं म्हणत भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. महारॅलीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोले म्हणाले. जाती-धर्माच्या आडून लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.